राजकारणी भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे कट्टर नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात यशस्वी मंत्र्यांमध्ये समावेश आहे. त्यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम केले आहे आणि त्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक रस्ते, महामार्ग आणि उड्डाणपूल बांधले गेले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज 64 वर्षांचे झाले आहेत.
नितीन गडकरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी लाडाची नात ही नितीन गडकरी यांच्याकडेच होती. मोठे चिरंजीव निखिल यांना कन्यारत्न झाले.
Happy Birthday! Anandi Anand: A shower of good wishes and the arrival of grandchildren at home on grandfather Nitin Gadkari’s birthday; Watch the video
विशेष प्रतिनिधी
नागपुर: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तर वाढदिवसाच्या दिवशी नितीन गडकरी यांच्या घरी नातीचे आगमन झाले आहे.Happy Birthday! Anandi Anand: A shower of good wishes and the arrival of grandchildren at home on grandfather Nitin Gadkari’s birthday; Watch the video
नितीन गडकरी यांचे मोठे चिरंजिव निखिल यांना कन्यारत्न झाले. आज नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लाडक्या नातीचे निवासस्थानी आगमन झाले.
त्यामुळे घरी एकच आनंदाचे वातावरण पसरले. नितीन गडकरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी लाडाची नात ही नितीन गडकरी यांच्याकडेच होती.
घरातील छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येत यावेळी धम्माल केली. बच्चे कंपनींनी आपल्या छोट्याशा हातांनी तयार केलेले वाढदिवसाचे खास ग्रिटिंग कार्ड नितीन गडकरींना दिलं.
त्यांनीही मोठ्या उत्सुक्तेनं बच्चे कंपनीचं गिफ्ट उघडून पाहिलं. हा आनंदाचा सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.