विशेष प्रतिनिधी
लखनऊ : धर्मांतराचा रॅकेटमध्ये दररोज वेगवेगळे गंभीर आणि सनसनाटी खुलासे होत आहेत या रॅकेटमध्ये उत्तर प्रदेशातील बीडचा आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तिकारूद्दीन याचा हात असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या मोहम्मद इफ्तिकारूद्दीन हा उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहे.Hand of Uttar Pradesh cadre IAS officer in conversion racket; Mohammad Iftikharuddin soon passed away
धर्मांतराचा रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याचे विविध व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. उत्तर प्रदेश पोलीस त्याची चौकशी करत आहेत. कानपूरला मंडल आयुक्त आणि श्रम आयुक्त असताना मोहम्मद इफ्तिकारूद्दीन यांच्या सरकारी निवासस्थानी काही लोकांचे धर्मांतर करण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. याची पोलीस चौकशी करत असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिली आहे.
धर्मांतराचा रॅकेटमध्ये आत्तापर्यंत एकूण 14 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून या रॅकेटची तार किती खोलवर आहे ते खोलून काढले जात आहे आणि त्यातून विविध प्रकारचे धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत.
आता मोहम्मद इफ्तिकारूद्दीन याला पोलिस लवकरच अटक करण्याची शक्यता आहे. अटकेतून त्याच्या अटकेतून धर्मांतरासाठी पुरवण्यात येणाऱ्या पैशाचा संदर्भातला महत्त्वाचा खुलासा पुढे येण्याची शक्यता आहे
यामध्ये आंतरराष्ट्रीय टेरर फंडिंग, मनी लॉन्ड्रिंग यांच्यापासून ते खंडणीच्या पैशांपर्यंत अनेक आर्थिक गैरव्यवहार यांचा समावेश असण्याची शक्यता उत्तर प्रदेश पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Hand of Uttar Pradesh cadre IAS officer in conversion racket; Mohammad Iftikharuddin soon passed away
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या 3 बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई : अनिल परब चौकशीसाठी पोहोचले, भावना गवळींच्या निकटवर्तीयाला अटक, आनंदराव अडसूळ रुग्णालयात दाखल
- मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या जवळच्या सहकारी सईद खानला अटक
- उरीमध्ये दहशतवादावर प्रहार, भारताच्या लष्कराने पाक घुसखोराला पकडले, 5 दिवसांत 4 दहशतवादी यमसदनी
- ‘पांचजन्य’ने अमेझॉनला केले लक्ष्य, ईस्ट इंडिया कंपनी 2.0 म्हणून उल्लेख, लघु उद्योगांवरील परिणाम केले उघड
- पक्षात लोकांना आणण्यासाठी काँग्रेसची धडपड, तामिळनाडूच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना सोन्याचे आमिष, ‘लोकांना आणा अन् सोने जिंका!’