वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हल्द्वानीमध्ये हिंसाचार भडकवण्यामागे पाकिस्तानी टूलकिटच्या कटाचा खुलासा झाला आहे. भारतीय गुप्तचर सुरक्षा संस्थांच्या तपासादरम्यान याचे पुरावे मिळाले आहेत. हल्द्वानीत झालेला हिंसाचार काही सोशल मीडिया अकाउंटद्वारे केल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टचा परिणाम होता. चौकशीत सर्व अकाउंट पाकिस्तानमध्ये बोटने संचलित सोशल मीडिया खात्यावर दिसले. या संपूर्ण घटनाक्रमात पाकिस्तान सहभागी झाल्याशी संबंधित अहवाल गृह मंत्रालयाला सोपवला आहे. Hand of Pakistan’s Toolkit in Inciting Haldwani Violence; Reports of intelligence agencies to the Ministry of Home Affairs
सूत्रांनुसार, जेव्हा हल्द्वानीत न्यायालयाने बनभूलपुरात अवैध पद्धतीने अतिक्रमण करून बांधलेला मदरसा पाडण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर पाकिस्तानने तेथे दंगल घडवण्याचा कट रचत पाकिस्तानी टूलकिट तयार केले. यासाठी मोहंमद अख्तर, आसिफ पॉलिटिक लेस, मोहंमद आलम, अरकाम, आलम शेख आणि आसिफ मन्सूरी यांच्या नावाने १० बॉट आधारित टि्वटर हँडल सक्रिय केले. या टि्वटर हँडल्सवर लोकांना चिथावणे सुरू केले.
हल्द्वानीच्या घटनेनंतर त्वरित पाकिस्तानातून ९ हॅशटॅग सक्रिय
हल्द्वानी घटनेनंतर पाकिस्तानच्या कराची, इस्लामाबाद, ऐबोटाबाद आणि लाहोरमधून त्वरित ९ हॅशटॅग सक्रिय झाल्याचे गुप्तचर संस्थांना हाती पुरावे लागले आहेत. त्यात हल्द्वानी बर्निंग, हल्द्वानी राइट्स, हल्द्वानी व्हायलन्सचा प्रयोग करून चिथावणीखोर पोस्ट टि्वटरवर टाकल्या.
Hand of Pakistan’s Toolkit in Inciting Haldwani Violence; Reports of intelligence agencies to the Ministry of Home Affairs
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांना भारत भेटीचे निमंत्रण दिले, 8 भारतीयांच्या सुटकेवर म्हणाले…
- हल्दवानीत प्रशासनाचा बडगा; हिंसाचाराचा मास्टरमाईंड अब्दुल मलिककडून होणार 2.44 कोटींची वसुली; 127 शस्त्रपरवाने रद्द!!
- लंडनच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणार
- ..अखेर मिमी चक्रवर्ती यांनी खासदारकी सोडण्याची केली घोषणा!