वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्व आणि कट्टर इस्लामी हिंसक दहशतवादी संघटनांची तुलना केल्याच्या मुद्द्यावर भाष्य करण्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते हनान मुल्ला यांनी टाळले, पण त्याच वेळी त्यांनी संघ परिवार आणि अफगाणिस्तान मधल्या तालिबानची तुलना करून घेतली.Hanan Mullan will not speak on Salman Khurshid’s statement
आज पत्रकारांशी बोलताना हनान मुल्ला म्हणाले, की काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाविषयी काही वक्तव्य केले आहे, त्यावर मी बोलणार नाही पण आज तालिबान जे अफगाणिस्तानमध्ये करत आहे तेच संघ परिवार भारतात घडवून आणत आहे. संघ परिवार देशात दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून हिंसाचार आणि संघर्षाला चिथावणी देत आहे. देशात धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था स्थिर होऊ नये असेच त्यांचे प्रयत्न आहेत, अशी टीका हनान मुल्ला यांनी संघ परिवारावर केली.
एकीकडे सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही पण असा विश्वामित्री पवित्रा घेऊन दुसरीकडे हनान मुल्ला यांनी संघ परिवाराची तुलना अफगाणिस्तानात हिंसाचार माजविणाऱ्या तालिबान राजवटीशी करून घेतली आहे.
सलमान खुर्शीद यांनी अयोध्येच्या निकालाविषयी लिहिलेल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इस्लामी कट्टर हिंसक दहशतवादी संघटना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्याशी केली आहे. त्यावर आज खुलासा करताना सलमान खुर्शीद यांनी मखलाशी करून मी हिंदुत्वाची तुलना कट्टर इस्लामी दहशतवादी संघटनांशी केलेली नाही. त्यांना same म्हटलेले नाही, तर फक्त similar म्हटले आहे, असा दावा केला आहे.
Hanan Mullan will not speak on Salman Khurshid’s statement
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी