वृत्तसंस्था
काबूल : तालिबानने काबूलवर हल्ला केला नाही, तर ही राजधानी ताब्यात घेण्यासाठी मीच त्यांना निमंत्रण दिले होते,’ असा दावा अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी केला आहे. जनतेचे रक्षण करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. Hamid Karzai told Taliban to enter in Afghanistan
‘असोसिएटेड प्रेस’ने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान हमीद करझाई यांनी अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या देश सोडून जाण्याच्या आणि तालिबानने सत्ता ताब्यात घेण्याच्या घटनेबद्दल माहिती दिली. ‘‘अश्रफ घनी ज्यावेळी देश सोडून निघून गेले, त्यावेळी त्यांचे सुरक्षा अधिकारीही निघून गेले. संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मलाही देश सोडून जाण्याची संधी असल्याचे सांगितले.
काबूलमध्ये कोणताही सुरक्षा अधिकारी थांबला नव्हता. अशा वेळी इतर देशविरोधी संघटनांच्या हातात सत्ता जाऊन जनतेची होणारी संभाव्य लुट थांबविण्यासाठी आणि काबूलचे संरक्षण करण्यासाठी तालिबानला सत्ता हातात घेण्याचे मी निमंत्रण दिले,’’ असे करझाई यांनी सांगितले.
Hamid Karzai told Taliban to enter in Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
- प्रियांका गांधींच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेली नाहीत; प्राथमिक चौकशीतला निष्कर्ष
- यवतमाळमधील ढोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण ; पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला मिळाले शुभाशीर्वाद
- पिंपरी चिंचवड : तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलाची गोळी झाडून हत्या
- नाशिकच्या रावण घोड्याची मोठी चर्चा; सारंगखेडा येथील अश्व यात्रेत कुतूहल