वृत्तसंस्था
मल्लापूरम : इस्रायल हमास दहशतवादी संघटनेविरुद्ध पुकारलेला युद्धाला आज 22 दिवस होऊन इस्रायलचे लष्कर गाजा पट्टीत घुसले असताना हमासच्या एका म्होरक्याने केरळच्या मल्लापूरम मध्ये झालेल्या एका रॅलीत व्हर्च्युअल भाषण केले. त्याच्या भाषणाच्या वेळी बुलडोझर हिंदुत्व आणि यहुदी धर्म उखडून फेकण्याच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.Hamas leader addressed rally against Hinduism, Zionism
मल्लापूरम मध्ये सॉलिडॅरिटी युथ फोरम या मुस्लिम युवक संघटनेने इस्रायल विरोधात हमासच्या समर्थनासाठी मोठे रॅली घेतली. या रॅलीत बोलण्यासाठी आम्हास समोरच्या म्होरक्या खालिद मशाल याला निमंत्रित केले होते. या खालिद मशालने इस्रायल विरुद्ध गरळ ओकलेच, पण त्याचबरोबर भारतातले हिंदुत्व आणि इस्रायल मधला यहुदी धर्म उखडून फेकण्याची चिथावणीखोर भाषा केली. त्यावेळी त्याने रॅलीतून बुलडोझर हिंदुत्व आणि यहुदी धर्म यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला चिथावणी दिली.
केंद्रातील मोदी सरकारने भारताचे अधिकृत परराष्ट्र धोरण म्हणून इस्रायला पाठिंबा दिला आहे, पण त्याच वेळी युद्ध थांबून इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांनी चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याची वकालत केली आहे. दुसरीकडे देशात विरोधी पक्षाच्या राजवटींमध्ये हमास समर्थनासाठी काही ठिकाणी छुपी मोहीम चालवली जात आहे.
केरळच्या मल्लापूरम मधील रॅली सॉलिडॅरिटी युथ फॉर्मने आयोजित केली असली, तरी प्रत्यक्षात तिला केरळ मधल्या कट्टरवादी मुस्लिम संघटनांनी सर्व प्रकारचे राजकीय इंधन पुरवले होते. त्याचवेळी केरळ मधल्या कम्युनिस्ट सरकार सरकारने त्या रॅलीकडे त्या राहिलेल्या परवानगी देऊन चिथावणीखोर भाषणांकडे हेतूतः दुर्लक्ष केले.
Hamas leader addressed rally against Hinduism, Zionism
महत्वाच्या बातम्या
- थकीत कर्जाची वसुली संध्याकाळी 7 नंतर बंद; एजंट सकाळी 8 वाजेपर्यंत कॉल करू शकणार नाहीत, RBI ने आणले नवीन नियम
- टाटा समूह भारतात आयफोन बनवणार; टाटाचा विस्ट्रॉनशी 1,000 कोटी रुपयांचा करार, 2.5 वर्षांत सुरू होईल उत्पादन
- काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सनातन धर्माचा अपमान केला तर बघेल गप्प का बसले?’, भाजपाचा थेट सवाल!
- केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, ”सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी घट , मात्र…”