• Download App
    हमासने इस्रायलवर 8 क्षेपणास्त्रे डागली; 5 महिन्यांनंतर तेल अवीववर केला हल्ला|Hamas fires 8 missiles at Israel; 5 months later Tel Aviv was attacked

    हमासने इस्रायलवर 8 क्षेपणास्त्रे डागली; 5 महिन्यांनंतर तेल अवीववर केला हल्ला

    वृत्तसंस्था

    तेल अवीव : हमासच्या अल-कासिम ब्रिगेडने रविवारी इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात, हमासच्या संरक्षण शाखा, अल-कासिम ब्रिगेड्सने ही कारवाई इस्रायली हत्याकांडाला प्रत्युत्तर म्हणून केली असल्याचे सांगितले. नंतर इस्रायली लष्करानेही राफा येथून 8 रॉकेट डागल्याची कबुली दिली.Hamas fires 8 missiles at Israel; 5 months later Tel Aviv was attacked

    रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जानेवारीनंतर इस्रायलवर हमासने केलेला हा पहिला मोठा हल्ला मानला जात आहे. हमास अल-अक्सा टीव्हीने सांगितले की, गाझा पट्टीतून रॉकेट हल्ले करण्यात आले. रिपोर्टनुसार, इस्रायली सैन्याने अनेक शहरांमध्ये सायरन वाजवून संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता.



    इस्रायली लष्कर कबूल – हमासने 8 रॉकेट डागले

    तेल अवीवमध्ये गेल्या ५ महिन्यांपासून सायरनचा आवाज कधीच ऐकू आला नव्हता. अशा परिस्थितीत, आज अचानक सायरन वाजल्याबद्दल इस्रायली लष्कराने सुरुवातीला कोणतीही विशेष माहिती दिली नव्हती. मात्र नंतर त्यांनी 8 रॉकेट हल्ले करण्यात आल्याचे सांगितले.

    लष्कराने सांगितले की, रफाह येथून हल्ले मध्य इस्रायलकडे निर्देशित केले गेले. यातील अनेक हल्ले रोखण्यात त्यांना यश आले. दरम्यान, इस्रायलच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेने म्हटले आहे की, त्यांच्याकडे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

    इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवल्याचा दावा केला

    याआधी शनिवारी अल-कासिम ब्रिगेडने इस्रायली लष्करासमोर दावा केला होता की गाझामध्ये अनेक इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवण्यात आले होते. शनिवारी हमासच्या अल-कासिम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी रेकॉर्ड केलेल्या संदेशाद्वारे ही माहिती दिली.

    हमासचे प्रवक्ते उबैदा यांनी दावा केला आहे की शनिवारी उत्तर गाझामधील जबलिया येथे झालेल्या लढाईत त्यांच्या सैनिकांनी अनेक इस्रायली सैनिकांना ठार केले आणि काही ओलीस पकडले. मात्र, किती जवानांचे अपहरण करण्यात आले आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.

    रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, उबेदाने सांगितले की, हल्ल्यांदरम्यान आमच्या सैनिकांनी एका बोगद्यात ज्यू सैन्यासाठी सापळा रचला. ते बोगद्यात शिरताच आम्ही त्यांच्यावर हल्ला केला. या काळात काही इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमीही झाले. नंतर बाकीच्या ज्यू सैन्याने तेथून माघार घेतली.

    हमासने एक व्हिडीओही जारी केला आहे ज्यात त्यांचे सैनिक एका इस्रायली सैनिकाला बोगद्यात ओढताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये जवान गंभीर जखमी झाला आहे. मात्र, अद्याप या व्हिडिओची पडताळणी झालेली नाही. दुसरीकडे इस्रायलने हमासचे दावे फेटाळून लावले आहेत.

    Hamas fires 8 missiles at Israel; 5 months later Tel Aviv was attacked

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!