वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची केंद्र सरकारने आपल्या कार्यालयांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर विविध विद्यापीठे, महाविद्यालये यांनी देखील तशीच सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचाही समावेश आहे. Half day holiday of Jamia Millia Islamia University on January 22
केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अर्धा दिवसाची सुट्टी विद्यापीठ प्रशासन आणि सर्व अभ्यासक्रम वर्गांना असेल. दुपारी 2.30 वाजता विद्यापीठ सुरू होईल. त्या दिवशीची परीक्षा आणि अन्य अनिवार्य उपक्रम यात कुठलाही बदल केलेला नाही, अशी नोटीस जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काढली आहे.
– महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
महाराष्ट्र सरकारने येत्या 22 जानेवारीला श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये आधीच सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. 22 जानेवारीला देशभरात दीपावली साजरी करावी, घरोघरी दीपोत्सव साजरा करण्यात यावा. प्रत्येक घरात रामज्योत प्रज्ज्वलित करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पणाचा कार्यक्रम हा अतिशय भव्यदिव्य असणार आहे. या कार्यक्रमाला देश-विदेशातील 6000 व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. यामध्ये सिनेकलाकार, आंतरराष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश असणार आहे.
Half day holiday of Jamia Millia Islamia University on January 22
महत्वाच्या बातम्या
- दावोसमध्ये 3.53 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार करून मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत!!
- वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने २५ पेक्षा अधिक विद्यार्थी बुडाले!
- अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या रामभक्तांना अल्पसंख्याक मोर्चा मोफत चहा देणार!
- राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!