• Download App
    ज्ञानव्यापी मशीद - शृंगार गौरी मंदिर परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण; हिंदू - मुस्लिमांची घोषणाबाजीGyanvapi Masjid - Videography Survey of Shringar Gauri Temple Premises

    Kashi : ज्ञानव्यापी मशीद – शृंगार गौरी मंदिर परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण; हिंदू – मुस्लिमांची घोषणाबाजी

    वृत्तसंस्था

    काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरात असलेल्या ज्ञानव्यापी मशीद आणि तिच्या परिसरात असलेल्या शृंगार गौरी मंदिराचे व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षण सध्या न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या सर्वेक्षणाचा मुस्लिम पक्षाने विरोध केला आहे. दुपारी 3.00 वाजल्यापासून 6.00 वाजेपर्यंत हे सर्वेक्षण होत आहे. त्याचा रिपोर्ट हायकोर्टाला सादर केला जाईल आणि त्यानंतर शृंगार गौरी मंदिरात दररोज पूजन करायला परवानगी द्यायची का नाही याचा निर्णय देणार आहे. Gyanvapi Masjid – Videography Survey of Shringar Gauri Temple Premises

    ज्ञानव्यापी मशीद परिसरामधील या मंदिर समूहांमध्ये शृंगार देवी मंदिर आहे. ते सध्या फक्त नवरात्रातल्या चतुर्थीला उघडून पूजाअर्चा केली जाते. मात्र काही महिलांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली असून शृंगार गौरी मंदिरात दररोज पूजा अर्चना करण्याची परवानगी मागितली आहे. ज्ञानव्यापी मशीद ट्रस्ट याला विरोध आहे. असे कोणतेही स्वतंत्र शृंगार गौरी मंदिर अस्तित्वात नाही, असा मुस्लीम पक्षाचा दावा आहे.

    यासंदर्भात हायकोर्टाने नेमलेली समिती सध्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करीत आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यावर त्यावर आधारित निर्णय घेणे अपेक्षित आहे.

    आज सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर ज्ञानवापी मस्जिद परिसर येथे बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा ठेवला आहे. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या 4 नंबर गेट पासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. तेथेच एका महिलेने नमाज पठण केले तिला पोलिसांनी ताबडतोब बाजूला केले असून त्याच वेळी हर हर महादेव आणि अल्लाहू अकबर ची घोषणाबाजी झाली आहे.

    गेट नंबर 4 वर नमाजपठण करणारी महिला मानसिकदृष्टया असंतुलीत आहे. तिच्या पतीने तिला सोडून दिले आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून 7 मुले असल्याचे तिने नंतर पोलिसांना सांगितले आहे.

    Gyanvapi Masjid – Videography Survey of Shringar Gauri Temple Premises

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    JDS Ex MP Prajwal Revanna : बलात्कार प्रकरणात JDSचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी; रडत कोर्टाबाहेर आला, आज शिक्षा जाहीर होणार

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- अधिकाऱ्यांकडून मतांची चोरी, आम्ही सोडणार नाही, भलेही ते निवृत्त होऊ द्या

    Jaishankar : बांगलादेशच्या नकाशात भारताच्या 7 राज्यांचा भाग; संसदेत प्रश्न उपस्थित, जयशंकर म्हणाले- प्रकरणावर बारकाईने लक्ष