वादग्रस्त प्रकरणात वाराणसी न्यायलयाने दिला निकाल
विशेष प्रतिनिधी
वाराणसी : वादग्रस्त जागा वगळता संपूर्ण ज्ञानवापी परिसराचे एएसआय सर्वेक्षण करणार आहे. ज्ञानवापी प्रकरणात वाराणसीच्या कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. Gyanvapi Case ASI survey of the entire Gyanvapi area except the disputed part
ज्ञानवापी परिसरामधील सील केलेला वजुखाना वगळता बॅरिकेडेड क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी एएसआयने न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच हिंदू पक्षाने एएसआय सर्वेक्षणाची मागणी केली होती, असे म्हटले होते की परिसरामधील संपूर्ण सत्य उघड झाले आहे.
काय आहे वाराणसीच्या ज्ञानवापी संकलाचे सत्य, घुमटाखाली आणखी एक शिवलिंग गाडले आहे का? ज्ञानवापी परिसरात असलेल्या डमरू आणि त्रिशूळाच्या खुणा मंदिराच्या आहेत की मशिदीच्या, हे एएसआयच्या सर्वेक्षणातून समोर येण्याची अपेक्षा आहे. या सर्वेक्षणाबाबत न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.
ज्ञानवापी मशीद संकुलाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सर्वेक्षण करून घेण्याच्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने अंजुमन इंतजामिया आणि हिंदू बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. सर्व युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १४ जुलै रोजी निकाल राखून ठेवण्यात आला होता.
Gyanvapi Case ASI survey of the entire Gyanvapi area except the disputed part
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार मोठा झटका; नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह, पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांना पाठिंबा!
- पवार अजूनही सुप्रिया सुळेंच्या हातात सूत्रे का देत नाहीत??; त्यांना जानकी रामचंद्रन, शशिकला, एन. टी रामाराव आठवतात का??
- Manipur violence : ‘’… अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल’’ राज ठाकरेंचं विधान!