• Download App
    केंद्राच्या भूमीकेमुळे जम्मू काश्मी रचे नागरिक निराशेच्या खोल गर्तेत - गुपकार आघाडीचा आरोप। Gupkar alliance targets Modi Govt.

    केंद्राच्या भूमीकेमुळे जम्मू काश्मी रचे नागरिक निराशेच्या खोल गर्तेत – गुपकार आघाडीचा आरोप

    वृत्तसंस्था

    श्रीनगर – नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत जम्मू काश्मीररचे नेते मोठ्या आशेने सहभागी झाले होते. परंतु जम्मू काश्मीररच्या नागरिकांच्या मनात विश्वाहस निर्माण करण्यासाठी कोणतेही उपाय केले गेले नाहीत. जम्मू काश्मीशर हे दिल्ली आणि भारताच्या मनापासून पूर्वीइतकाच आजही दूर असल्याचा आरोप गुपकार आघाडीने केला आहे. याउलट ही दरी आणखी वाढत चालली असून नागरिक निराशाच्या गर्तेत जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. Gupkar alliance targets Modi Govt.



    जम्मू काश्मीररला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० वगळून त्यास त्याची विभागणी दोन केंद्रशासित राज्यात करण्याच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसह जम्मू काश्मींरच्या विविध विचारसरणीच्या पक्षांची आघाडी (पीएजीडी) ने निवेदन जारी केले.

    माकपचे ज्येष्ठ नेते एम.वाय.तारिगामी म्हणाले की, पाच ऑगस्टला विशेष दर्जा काढून घेणे हा एकप्रकारे घटनेवरचा हल्ला आहे. त्यामुळे भारत संघराज्यांशी असलेल्या काश्मीेरच्या संबंधाला धक्का बसला आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीकरच्या अस्मितेवर हल्ला करून सर्व मर्यादा ओलांडल्या. जम्मू काश्मीमरच्या नागरिकांना धीर सोडून नये आणि एकजूट राहावे, असे आवाहनही आघाडीच्या वतीने करण्यात आले.

    Gupkar alliance targets Modi Govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदी + राजनाथ + जयशंकर उच्चस्तरीय बैठक, Operation sindoor अजून सुरूच, भारतीय हवाई दलाचा स्पष्ट खुलासा!!

    Monsoon : मान्सून 4 दिवस आधी 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता; 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज

    IMF gave Pakistan : IMFने पाकला दिले 12 हजार कोटींचे कर्ज; भारताने म्हटले- दहशतवादाला निधी देणे धोकादायक