विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरात सरकारने राज्यातील सर्व खासगी रुग्णालये, चिकित्सालये, शुषृशा गुहे आणि दवाखान्यांना १५ जूनपर्यंत कोरोना रुग्णांवर उपचाराची परवानगी दिली आहे. नवे तज्ज्ञ डॉक्टर आकर्षक मानधनावर नियुक्त करण्याचा निर्णयही झाला.Gujrat govt. tooks massive steps for covid treatment
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयांना सरकारकडे कोणतीही परवानगी मागावी लागणार नाही, पण जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांना कोरोना रुग्णांची माहिती कळवावी लागेल.
दरम्यान, तीन महिन्यांसाठी नवे तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक कर्मचारी नेमण्याचाही निर्णय झाला. त्यानुसार दरमहा तज्ज्ञ डॉक्टरांना अडीच लाख, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सव्वा लाख, दंतरोगतज्ज्ञांना ४० हजार, आयुष-होमिओपॅथी डॉक्टरांना ३५ हजार रुपये मानधन मिळेल.
बाहेरील संस्थांकडून नेमल्या जाणाऱ्या तृतीय श्रेणीतील परिचारिकांना दरमहा वीस हजार रुपये मिळतील.सर्व प्रकारच्या प्रशिक्षित डॉक्टर व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी पुढे यावे असे आवाहन रुपानी यांनी केले.
Gujrat govt. tooks massive steps for covid treatment
महत्वाच्या बातम्या
- मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली हतबलता व्यक्त
- महावीर जयंती, हनुमान जयंतीच्या मिरवणुका, प्रभात फेऱ्यांना बंदी ; पुणे आयुक्तांच्या सूचना
- संजय काकडे यांना भोवला अजित पवारांशी पंगा, गुंड गजा मारणेच्या रॅलीला मदत केल्याच्या आरोपावरून झाली अटक
- ‘मदर इंस्पेक्टर-दंतेश्वरी फायटर’ शिल्पा साहू ऑन ड्युटी ; कडक सॅलूट
- केवळ नावातील ‘ऑक्सिजन’मुळे इन्व्हेस्टमेंट कंपनीला जबरदस्त प्राणवायू! केवळ वीस दिवसांत शेअरचा भाव ११,५०० वरून २४,५०० रुपये