विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद – गुजरातमधील १७० पालिकांपैकी ६८ पालिकांच्या आकडेवारीवरून मार्च २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान १६,८९२ जणांचा कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू झाला आहे. यात कोरोनाबाधित परंतु संपूर्ण राज्यांची एकूण मृतांची आकडेवारी तपासल्यास गुजरातमध्ये कोविडमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या किमान २.८१ लाखावर गेल्याचे आढळून येते. सरकारी आकड्याशी तुलना केल्यास ही संख्या २७ पटीने अधिक आहे. Gujrat Govt. gave false information about death of people
‘द वायर‘ च्या टीमने कोरोना मृत्यूच्या आकडेवारीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी राज्यातील १७० पालिकांपैकी ६८ जणांकडील मृत्यू नोंदणीचे रेकॉर्ड तपासले. या रेकॉर्डमध्ये अधिकाऱ्यांकडून मृत्यूचे कारण नमूद केले जाते. या नोंदवहीच्या विश्लेरषणातून ६८ पालिकेत मार्च २०२० आणि एप्रिल २०२१ दरम्यान कोरोना येण्यापूर्वी एक वर्ष अगोदर २०१९ च्या कालावधीच्या तुलनेत अन्य आजाराने १६,८९२ जणांचा मृत्यू झाला.
६८ पालिकांत राज्यात ६.०३ कोटी लोकसंख्या असून ती राज्यांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ६० टक्के इतकी आहे. यानुसार एका अंदाजाने कोरोनामुळे राज्यात किमान २.८१ लाख जणांचा मृत्यू झाला असून सरकारने दिलेल्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या २७ पट अधिक आहे.
एप्रिल २०२१ मध्ये ६ टक्के लोकसंख्येत कोविड वगळता १०,२३८ अन्य कारणांमुळे मृत्यूची नोंद झाली. ही आकडेवारी संपूर्ण कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्या १०,०७५ अधिकृत आकड्यापेक्षा अधिक आहे.
Gujrat Govt. gave false information about death of people
महत्वाच्या बातम्या
- तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा, सौदी अरेबियातून पत्नीला फोनवरून दिला तलाक
- हिंदूत्वा ची तुलना तालीबान्यांशी, अभिनेत्री स्वरा भास्करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
- तालीबान्यांच्या विजयाने भारतातही शाब्दिक फटाके, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याने केला सलाम, हिंद मुस्लिमांना वाटतो गर्व
- तालीबानच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या खासदारासह दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा, भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली तुलना
- शिवसेना आमदार यामिनी जाधव यांना अपात्र ठरविण्याची आयकर विभागाची शिफारस, निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती