वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होत असून 8 डिसेंबर 2022 रोजी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीचेही निकाल लागणार आहेत. Gujrat assembly election bugle sounded
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा याआधीच करण्यात आली असून तेथे प्रचार देखील सुरू झाला आहे.
त्या पाठोपाठ गुजरात विधानसभा निवडणूक देखील घोषित झाली असून 1 आणि 5 डिसेंबर 2022 रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे, तर 8 डिसेंबर 2022 रोजी दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल एकदम जाहीर होणार आहेत. निवडणूक संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 10 डिसेंबर 2022 रोजी संपुष्टात येणार आहे.
- गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागा असून 89 मतदारसंघांमध्ये 1 डिसेंबरला, तर 93 मतदारसंघांमध्ये 5 डिसेंबरला मतदान होईल. त्यासाठी मतदान केंद्रांची संख्या 51,782 असणार आहे.
- गुजरात विधानसभा निवडणुकीत 3,24,422 नवीन मतदार पहिल्यांदा मतदान करणार असून एकूण मतदान केंद्रांची संख्या 51,782 आहे.
- संपूर्ण राज्यामध्ये 50% मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था असेल.
- 51,782 एकूण मतदान केंद्रांपैकी 1274 मतदान केंद्रांचे प्रबंधन आणि सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे महिला कर्मचारी करतील.
Gujrat assembly election bugle sounded
महत्वाच्या बातम्या
- 75000 रोजगार संकल्प : महाराष्ट्रात आज 3 नोव्हेंबरला सर्व विभागांमध्ये पहिले रोजगार मेळावे
- रशियाकडून भारताची तेल खरेदी : स्टुडिओत बसून खोटे नॅरेटिव्ह सेट करू नका; हरदीप सिंह पुरींनी सीएनएन अँकरला सुनावले
- नोकरीची संधी : केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागात मोठी भरती; लवकर करा अर्ज
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा