या हिंसाचारात ११ जणांचा झाला होता मृत्यू
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : नरोडा गावातील हिंसाचारात माजी मंत्री माया कोडनानी, बाबू बजरंगी, जयदीप पटेल यांच्यासह ६७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुजरातच्या विशेष न्यायालयाने आज (२० एप्रिल) या प्रकरणी निकाल दिला. या हिंसाचारात ११ जणांचा मृत्यू झाला होता. Gujarat Riots All 67 accused including Maya Kodnani and Babu Bajrangi acquitted in Naroda violence case
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यात पेट्रोल टाकून अनेकांना जिवंत जाळण्यात आले होते. याला प्रत्युत्तर म्हणून २८ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरात बंदची घोषणा करण्यात आली. दरम्यान, अहमदाबाद शहरासह संपूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या. या दंगलींमध्ये २८ फेब्रुवारी रोजी नरोडा गावाच्या आत आणि बाहेर ११ लोकांना जिवंत जाळण्यात आले होते.
१८ आरोपींचा झाला मृत्यू –
या खटल्यात भाजपाच्या माजी आमदार माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह एकूण ८६ आरोपी होते, परंतु त्यापैकी १८ जणांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. गोध्रा ट्रेन जाळण्यात आल्याच्या घटनेत ५८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी २८ फेब्रुवारी २००२ रोजी अहमदाबाद शहरातील नरोडा गाव परिसरात दंगल उसळली होती.
या प्रकरणात गृहमंत्री अमित शहा २०१७ मध्ये कोडनानी यांच्या बचावासाठी साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर झाले होते. २००२ मध्ये, कोडनानी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकारमध्ये मंत्री होत्या. कोडनानी यांना नरोडा पाटिया दंगल प्रकरणातही दोषी ठरवण्यात आले होते ज्यात ९७ लोक मारले गेले होते आणि त्यांना २८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता.
Gujarat Riots All 67 accused including Maya Kodnani and Babu Bajrangi acquitted in Naroda violence case
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!..
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!
- सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण