वृत्तसंस्था
अहमदाबाद : ललित पाटीलच्या ड्रग्स कारनाम्यापाठोपाठ आणखी ड्रग्स कारनामे उघडकीस येत असून गुजरात पोलिसांची अहमदाबाद गुन्हे शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी महाराष्ट्रात संयुक्त कारवाईत करून छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यावर छापा घालून तेथून कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल 500 कोटी रुपये आहे.Gujarat Police raids in Chhatrapati Sambhajinagar; Cocaine, ketamine and MD drugs worth Rs 500 crore seized!!
या ठिकाणी रसायनांच्या आडून ड्रग्ज तयार केली जात असल्याचे तपासात उघड झाले. सध्या हे ड्रग्ज कुठे आणि कुणाला पुरवली जात होती, याचा तपास सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवणारा कारखाना आढळल्यानंतर देशातील उच्च सुरक्षा यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यात कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याची गुप्त माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर डीसीपी आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला. तपासादरम्यान ही माहिती खरी आढळून आली असून छत्रपती संभाजीनगर येथील या कारखान्याची खरी लिंक सापडली आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने डीआरआयची मदत घेत ही मोठी कारवाई केली.
300 कोटी रुपयांचे ड्रग्ज तयार करण्याची होती तयारी
संभाजीनगरमधील या कारखान्यातून 200 कोटी रुपयांच्या तयार ड्रग्जसह 300 कोटी रुपयांचा कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत या कच्च्या मालापासून 300 कोटी रुपयांची ड्रग्ज तयार करण्याची तयारी होती.
सध्या या प्रकरणाचे सगळे धागेदोरे जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम सायंकाळपर्यंत या प्रकरणाची संपूर्ण माहिती मीडियाला देऊ शकते. दरम्यान, जितेश कुमार प्रेमजी भाई हिंहोरिया (वय-44 वर्षे) एनडीपीएस कायदा कलम 22,28,29 अंतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
ललित पाटीलला अटक झाल्या पाठोपाठ महाराष्ट्राचा उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र करण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटातून करण्यात आला, पण हा उडदा महाराष्ट्र नेमका कोणाच्या काळात सुरू झाला?, त्याचे धागेदोरे आता उघडकीस येत आहेत.
Gujarat Police raids in Chhatrapati Sambhajinagar; Cocaine, ketamine and MD drugs worth Rs 500 crore seized!!
महत्वाच्या बातम्या
- महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार
- भारताचा मोस्ट वॉन्टेड लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक पाकिस्तानात ठार
- खासदार महुआ मोईत्रांच्या लाचखोरीतून प्रश्न घोटाळ्यातून तृणमूळ काँग्रेसने झटकले हात!!
- महुआ मोईत्राच्या अडचणी वाढण्याची चिन्हं! लोकसभा अध्यक्षांनंतर आता निशिकांत दुबे यांनी केली लोकपालकडे तक्रार