वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरात मधल्या “पती पत्नी और वो” या राजकीय कहाणीत वेगळा ट्विस्ट आला आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोळंकी यांनी राजकारणातील सध्या ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अर्थात यासाठी पक्षाच्या हायकमांडने आपल्याला कोणतीही सूचना केली नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. Gujarat Congress leader Bharatsinh Solanki’s break from politics
भरतसिंह सोळंकी हे दुसऱ्या महिलेबरोबर राहत होते. त्यांची पत्नी रेशमा यांनी त्या दोघांना एका फ्लॅटमध्ये रेड हँड पकडले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर गुजरातच्या राजकारणात जबरदस्त खळबळ माजली. आता भरतसिंह सोळंकी यांनी स्वतःहून आपण राजकारणात राजकारणातून सध्या ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे. अर्थात दलित आदिवासी अल्पसंख्यांक समुदायांना या पुढच्या काळात देखील भेटत राहणार. त्यांच्याशी संपर्क ठेवणार. त्यांचे प्रश्न सोडवणार असल्याची माहिती देखील भरतसिंह सोळंकी यांनी दिली आहे.
पत्नी रेश्मा विरोधकांच्या हातातले खेळणे
आपली पत्नी पत्नी रेश्मा पटेल तिला फक्त आपल्या संपत्ती मध्ये रस आहे. तिच्याविरुद्धचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. आपल्या राजकीय विरोधकांच्या हातातले खेळणे बनून ती त्रास देते आहे, असा आरोप भरतसिंह सोळंकी यांनी केला आहे.
गुजरातचा राजकारणावर परिणाम काय?
भरतसिंह सोळंकी यांनी राजकारणातून ब्रेक घेतल्याची घोषणा केल्याने गुजरात प्रदेशात आधीच डळमळीत असलेल्या काँग्रेस संघटनेला मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पटेल सारखा तरुण नेता आधीच काँग्रेस बाहेर पडला आहे. त्यातच आता भरतसिंह सोळंकी यांनी गुजरात विधानसभा निवडणुका अवघ्या सहा-आठ महिन्यांवर आलेल्या असताना राजकारणातून ब्रेक घेण्याचे जाहीर केल्याने त्यामुळे काँग्रेसचा जनाधार घटण्याची शक्यता आहे.
भरतसिंह सोळंकी हे ओबीसी समाजातून येतात. त्यांचे पिताजी माधवसिंह सोळंकी हे गुजरातचा राजकारणातले बडे व्यक्तिमत्व होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा बरोबरच देशाच्या परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांनी संभाळली होती.
भरतसिंह सोळंकी यांनी माधवसिंह सोळंकी यांचे वारसदार म्हणून गुजरात मध्ये काम केले आहे. यूपीए सरकारच्या काळात ते केंद्रीय मंत्री देखील राहिले आहेत.
त्यांच्यासारखा गुजरातचा राजकारणातील वजनदार नेता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पती पत्नी और वो या घोटाळ्यात अडकतो आणि त्यानंतर राजकारणात मी ब्रेक घेतो, या घटनेमुळे काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मोठा धक्का बसला आहे.
Gujarat Congress leader Bharatsinh Solanki’s break from politics
महत्वाच्या बातम्या
- राज्यसभा निवडणूक 2022 : महाराष्ट्रात 1998 ची पुनरावृत्ती होणार??; काँग्रेसचे राम प्रधान झाले होते पराभूत!! मग यंदा पडेल कोण??
- औरंगाबाद, उस्मानाबादचे खरंच नामांतर??, की मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी चर्चेची नुसतीच पुडी??
- ओबीसी आरक्षण : गोपीनाथ गडावरून शिवराज मामांचे ठाकरे – पवार सरकारवर शरसंधान; पंकजांची स्तुती!!
- मनसे घराघरात पोहोचणारा पक्ष नाही; तरीही राज ठाकरेंचे पत्र वाटणाऱ्या मनसैनिकांना अटक!!