वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरात मधील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोळंकी दुसऱ्याच महिले बरोबर आढळून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. Gujarat Congress leader Bharatsinh Solanki was found with another woman and his wife got angry
भरतसिंह सोळंकी आणि त्यांची पत्नी रेश्मा यांच्यात आधीच मोठा वाद आहे. दोघांनी एकमेकांविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज केला आहे. या पार्श्वभूमीवर भरतसिंह सोळंकी अहमदाबादमध्ये एका फ्लॅटमध्ये दुसऱ्या महिलेबरोबर आढळून आल्याचा व्हिडिओ गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून त्यामध्ये त्यांची पत्नी रेश्मा अचानक काही लोकांसह त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसली आहे आणि संबंधित महिलेला मारताना दिसते आहे. तूच माझ्या पतीला फसवले. जाळ्यात ओढले, असा आरोप रेश्मा करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्वतः भरतसिंह सोळंकी दोघींच्यामध्ये पडून ते त्या महिलेला वाचवायचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत.
हा व्हिडीओ गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून गुजरात काँग्रेस मध्ये त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. भरतसिंह सोळंकी यांच्यासारख्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांची वैयक्तिक प्रकरण बाहेर आल्याने त्यांच्याबद्दल आणि काँग्रेस पक्षावर सोशल मीडियावर जोरदार टीका टिप्पणी होत आहे.
भरतसिंह सोळंकी हे माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांचे पुत्र आहेत. पटेल वर्चस्व असलेल्या गुजरातमध्ये माधवसिंह सोळंकी हे काँग्रेसचे फार बडे नाव होते. भरतसिंह सोळंकी हे त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. पण त्यांचा पत्नी रेश्मा यांच्याशी वाद आहे. दुसऱ्या महिलेशी संबंधाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो आणखी चव्हाट्यावर आला आहे.
Gujarat Congress leader Bharatsinh Solanki was found with another woman and his wife got angry
महत्वाच्या बातम्या
- तिकिटावरून काँग्रेसमध्ये बंडाळीची चिन्हे : सोनियांचा नाराज गुलाम नबी आझाद यांना फोन; आनंद शर्मा पक्ष सोडणार असल्याची चर्चा
- भूक भागेना : केंद्राकडून मेपर्यंतची 14145 कोटींची जीएसटी भरपाई; तरीही पवार म्हणाले, अजूनही 15000 कोटी बाकी!!
- मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्यास 8 दिवसांत कायद्याचा बडगा!!; महापालिकेचे आदेश
- केंद्राकडून GST भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना जारी ; महाराष्ट्राला मिळाले तब्बल 14,145 कोटी