वृत्तसंस्था
गांधीनगर : टोकियो पॅरा ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या भाविना पटेल या दिव्यांग खेळाडूला गुजरात सरकारने तीन कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे.Gujarat CM Vijay Rupani congratulates #BhavinaPatel, for winning a Silver medal at Paralympic Games
गुजरात सरकारच्या दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या योजनेतून हा पुरस्कार भाविना पटेल हिला देण्यात येईल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी जाहीर केले. भाविना पटेल ही गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पॅरा ऑलिंपिक तसेच एकूण ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिस खेळात भारताला पदक मिळवून देणारी ही पहिलीच खेळाडू ठरली आहे.
भाविनाने रौप्य पदक मिळविल्यानंतर देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असून त्याला विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात जास्त रकमेचा तीन कोटी रुपयांचा पुरस्कार गुजरात सरकारने जाहीर केला आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनी तिने रौप्यपदक मिळवल्याबद्दल देशवासीयांना विशेष आनंद झाला आहे. सोशल मीडियावर राष्ट्रीय क्रीडा दिन, भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या बरोबरीने भाविना पटेल देखील ट्रेंड होताना दिसते आहे.
Gujarat CM Vijay Rupani congratulates #BhavinaPatel, for winning a Silver medal at Paralympic Games
- WATCH : नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत कणकवलीत जन आशीर्वाद यात्रा जल्लोषात
- WATCH : लोक कलावंत सरकारी मानधनापासून वंचितच सरकारच्या घोषणेचे काय झाले ? कलाकारांचा सवाल
- सूक्ष्म, लघू खात्यांना कितीसा निधी मिळणार? विचारणाऱ्या अजित पवारांचे अज्ञान नारायण राणेंनी पाडले उघडे…!!
- कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप , शोच्या टीमने संपर्क साधला, म्हणाले – मी विमानाचे तिकीट पाठवले तरच मी जाईन