विशेष प्रतिनिधी
गांधीनगर : गुजरातमध्ये तडकाफडकी मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोठी राजकीय मशक्कत करण्यात येत असून विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी राजीनामा दिला आहे. याचा अर्थ त्यांना भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात मोठे स्थान देण्यात येईल, असा करण्यात येतो आहे. Gujarat Assembly Speaker Rajendra Trivedi submits his resignation, which is effective from today
भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात वरिष्ठ नेत्यांची वर्णी लागणार नाही संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्यात येईल विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अर्धचंद्र देण्यात येईल, अशा बातम्या पसरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नाराजीच्याही बातम्या पसरल्या होत्या. त्यांनी माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांची भेट घेऊन चर्चा केल्याचेही पसरविण्यात आले होते.
परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी सांगितले. नरेश पटेल यांनी आपल्याला भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी फोन आला आहे, असे पत्रकारांना सांगितले आहे.
भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रीमंडळात सत्तावीस मंत्र्यांचा समावेश करण्यात येईल त्यातील बहुतांश चेहरे नवीन असतील, असे सांगण्यात येत आहे तरी देखील कोणीही खात्रीपूर्वक मंत्र्यांची नावे सांगू शकत नाही. आज दुपारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित आहे. विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी राजीनामा दिल्याने त्यांना मंत्रिमंडळात मोठे पद अर्थात उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Gujarat Assembly Speaker Rajendra Trivedi submits his resignation, which is effective from today
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप
- वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप