• Download App
    गुजरात : १६ वर्षांचा शाळकरी मुलगा फक्त पाच रुपयांसाठी करतोय ड्रग्जची तस्करी|Gujarat: A 16-year-old schoolboy is smuggling drugs for only five rupees

    गुजरात : १६ वर्षांचा शाळकरी मुलगा फक्त पाच रुपयांसाठी करतोय ड्रग्जची तस्करी

    पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्या १६ वर्षांच्या शाळकरी मुलाला निओल चेक पोस्ट येथून अटक करण्यात आली.Gujarat: A 16-year-old schoolboy is smuggling drugs for only five rupees


    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : ड्रग्जमाफिया अवैध धंद्यांसाठी,तसेच ड्रग्ज व अफीमच्या तस्करीसाठी शाळकरी मुलांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. याचच उदाहरण म्हणजे शाळेत शिकणाऱ्या एका मुलाला अफीमची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत वॉटर बॉटलमधून १.९८० किलो अफीम आढळून आला.अफीमची बाजारात किंमत १.९८ लाख रुपये आहे. हा शाळकरी मुलगा राजस्थानातून सुरतला अफीमची तस्करी करण्यासाठी आला होता. या मुलाबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्या १६ वर्षांच्या शाळकरी मुलाला निओल चेक पोस्ट येथून अटक करण्यात आली.



    पोलिस तपासात त्या मुलाने सांगितले कि, गावातील गोपाल शर्मा नावाच्या व्यक्तीने त्याला हा अफीम राजस्थानमधून सुरतला घेऊन जायला सांगितले होते.यासाठी त्याला फक्त ५ रुपये मिळणार होते. पोलीस मुख्य आरोपी गोपाल शर्मा याचा शोध घेत आहे.

    Gujarat: A 16-year-old schoolboy is smuggling drugs for only five rupees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची