• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या संयुक्त राष्ट्र संघात गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्ड!!Guinness Book of World Records at the United Nations on International Yoga Day

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या संयुक्त राष्ट्र संघात गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्ड!!

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : आज 21 जून 2023 आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त जगभरात कार्यक्रम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रांगणात योगाभ्यास केला यावेळी तब्बल 180 देशांचे प्रतिनिधी आणि नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्र संघाच्या इमारतीत अथवा प्रांगणात तब्बल 180 देशांचे प्रतिनिधी एकाच कार्यक्रमात सहभागी होणे हे वर्ल्ड रेकॉर्ड या निमित्ताने झाले. याची नोंद गिनीज बुकात घेतले गेली. Guinness Book of World Records at the United Nations on International Yoga Day

    पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भारताच्या राजदूतांना गिनीज बुक रेकॉर्डची प्रत अधिकाऱ्यांनी सोपवली. या भव्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी योग हा कॉपीराईट मुक्त सर्व जगाचा आहे. कारण प्रत्येक मानव मात्राचा त्यावर अधिकार आहे असे स्पष्ट केले.

    21 जून 2016 पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस साजरा होत आहे. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्या दरम्यानच त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रांगणात योगाभ्यास केला. यावेळी तब्बल 180 देशांचे प्रतिनिधी आणि नागरिक त्यांच्या समवेत योगाभ्यासाला उपस्थित होते आणि हेच नेमके गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

    Guinness Book of World Records at the United Nations on International Yoga Day

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Trump : खामेनेई म्हणाले- ट्रम्पचे हात रक्ताने माखलेले; ट्रम्प यांचे उत्तर- इराण सरकार काही दिवसांचे पाहुणे; इराणमधील हिंसाचारात 3 हजारहून अधिक मृत्यू

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Greenland : ग्रीनलँडमध्ये निदर्शने- ट्रम्प यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरले:, म्हटले- आमचा देश विक्रीसाठी नाही