तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचेही निधन झाले आहे. 8 डिसेंबर रोजी CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कुन्नूर, तामिळनाडू येथे क्रॅश झाले. या अपघातात बिपिन रावत त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात वरुण सिंग हे एकमेव बचावले होते. परंतु बुधवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. भारतीय हवाई दलाने ट्विट करून ही माहिती दिली. Group Captain Varun Singh dies, CDS Bipin Rawat injured in helicopter crash, Air Force reports
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचेही निधन झाले आहे. 8 डिसेंबर रोजी CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कुन्नूर, तामिळनाडू येथे क्रॅश झाले. या अपघातात बिपिन रावत त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात वरुण सिंग हे एकमेव बचावले होते. परंतु बुधवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. भारतीय हवाई दलाने ट्विट करून ही माहिती दिली.
आयएएफने ट्विट करून म्हटले आहे की, भारतीय वायुसेनेला हे कळवताना अत्यंत दु:ख होत आहे की, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या अपघातात ते एकमेव बचावले होते. वायुसेना अधिकारी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात आणि त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहेत.”
याच वर्षी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व नेत्यांनी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी अभिमानाने आणि पूर्ण व्यावसायिक वृत्तीने देशाची सेवा केली आहे. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी जीवनासाठी शूर लढा देऊन अखेरचा श्वास घेतला हे ऐकून दुःख झाले. हेलिकॉप्टर अपघातात गंभीर जखमी झाले असले तरी त्यांनी शौर्य आणि अदम्य धैर्याचे सैनिकी भाव दाखवले. राष्ट्र त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या कुटुंबाप्रति माझ्या संवेदना.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, माझ्याकडे शब्द नाहीत. ते खरे योद्धा होते, जे शेवटच्या श्वासापर्यंत लढले. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. या घडीला आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
लढवय्या कॅप्टन
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी आमदार अखिलेश प्रताप सिंह यांचे पुतणे आहेत. 12 ऑक्टोबर 2020 रोजी वरुण यांनी फ्लाइंग कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड होऊनही सुमारे दहा हजार फूट उंचीवरून विमानाचे यशस्वी लँडिंग केले. यासाठी 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींनी त्यांना शौर्य चक्र देऊन सन्मानित केले होते.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे उत्तर प्रदेशातील देवरिया येथील खोरमा कान्होली गावाचे रहिवासी होते. त्यांच्यावर बंगळुरू येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. वरुण हे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचे बॅचमेट होते. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना हुसकावून लावले होते.
वरुण सिंग यांचे वडीलही लष्करात
कॅप्टन वरुण सिंग यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे वय 42 वर्षे होते. त्यांचे वडील कृष्ण प्रताप सिंग हे लष्करात कर्नल म्हणून निवृत्त झाले होते. वरुण यांचा लहान भाऊ तनुज सिंग मुंबईत नौदलात आहे. त्यांची पत्नी गीतांजली यांना एक मुलगा रिद रमन आणि मुलगी आराध्या आहे.
हेलिकॉप्टर अपघात
संसदेत या दुर्घटनेची माहिती देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते की, ८ डिसेंबर रोजी दुपारी भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर ज्यामध्ये सीडीएस बिपिन रावत होते ते क्रॅश झाले. जनरल बिपिन रावत हे वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये जाणार होते. हवाई दलाच्या Mi 17 हेलिकॉप्टरने सुलूर एअरबेसवरून 11.48 वाजता उड्डाण केले. 12:15 ला वेलिंग्टनला उतरायचे होते. पण 12.08 वाजता ते क्रॅश झाले.
या अपघातात सीडीएस बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, कर्नल हरजिंदर सिंग, लान्स नाईक विवेक कुमार, नाईक गुरुसेवक सिंग, लान्स नाईक बी साई तेजा, नाईक जितेंद्र कुमार, हवालदार सतपाल राय, विंग कमांडर पी.एस. चौहान, स्क्वॉर्ड लीडर, लान्स नाईक बी साई तेजा. कुलदीप सिंग, राणा प्रताप दास, JWO प्रदीप यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अवघ्या देशात हळहळ व्यक्त होत आहे.
Group Captain Varun Singh dies, CDS Bipin Rawat injured in helicopter crash, Air Force reports
महत्त्वाच्या बातम्या
- STORY BEHIND SAMNA EDITORIAL : आता शिवसेनेसाठी धर्म म्हणजे अफूची गोळी ….! भगव्या वस्त्रांवरही आक्षेप…म्हणे राहुल गांधी म्हणतात तेच खरे …
- हिंदू व्होट बँकेवरून चंद्रकांत दादा – संजय राऊतांमध्ये खेचाखेची; राष्ट्रवादी – काँग्रेसची घसराघसरी!!
- ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा’ ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला
- पुणे – बंगळूर महामार्गावर कराड नजीक कोयना पुलाला पडले भगदाड; दुरुस्तीच काम वेगाने