वृत्तसंस्था
किव : रशियन राष्ट्रपती ब्लदमीर पुतीन यांच्याशी संवाद साधल्याबद्दल युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
Great assistance to Ukraine through dialogue with Russia; President Zelensky thanked Prime Minister Narendra Modi
राशियाने गेले काही दिवस युक्रेनवर जोरदार हल्ले चढविले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाबरोबर संवाद साधून मध्यस्ती करावी, अशी मागणी युक्रेनने वारंवार केली होती. भारताने यापूर्वी भारतीय विद्यार्थी यांना मायदेशी आणण्यासाठी युद्धबंदी करावी, असे आवाहनही रशियाला केले होते.
त्यानंतर सहा तास युद्ध रोखले सुद्धा होते. त्यानंतर मोदी यांनी वारंवार पुतीन यांच्याशी संवाद साधला होता.त्याचे परिणाम दिसत असल्याने युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्स्की यांनी समाधान व्यक्त केले आहे. रशिया युक्रेन युद्धात भारताने दिलेल्या पाठींब्याबाबत त्यानी समाधान व्यक्त केले आहे.