• Download App
    स्वागत समारंभात जय श्रीराम, काशी विश्वनाथ धाम; पण मोदींच्या भाषणात बुद्धाचे नाव आणि विकासाचे काम!!Grateful to the Indian community in Japan for their warm reception. Addressing a programme in Tokyo.

    Modi in Japan : स्वागत समारंभात जय श्रीराम, काशी विश्वनाथ धाम; पण मोदींच्या भाषणात बुद्धाचे नाव आणि विकासाचे काम!!

    वृत्तसंस्था

    टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यात त्यांनी नेहमीप्रमाणे भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यावेळच्या त्यांच्या संबोधनात आणि त्यांच्या स्वागतात काही विशिष्ट फरक दिसला. Grateful to the Indian community in Japan for their warm reception. Addressing a programme in Tokyo.

    – जय श्रीरामचा घोष

    मोदींच्या स्वागत समारंभात “जय श्रीराम” “काशी विश्वनाथ धाम” यांचा जयजयकार झाला. पण सध्या काशी विश्वनाथ धाम आणि ज्ञानवापी मशिद हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भगवान बुद्धाचे नाव आणि विकासाचे काम यावर अधिक भर दिला.

    भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना जय श्रीरामच्या जोरदार घोषणा दिल्या. काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर तयार करणारे पंतप्रधान मोदी हे “भारताचे सिंह” आहेत, अशा भावना प्रकट केल्या.

    – स्वामी विवेकानंद, टागोर, महात्मा बुद्ध

    पण मोदींनी मात्र आपल्या भाषणामध्ये स्वामी विवेकानंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे उल्लेख करत भारत – जपान संबंधांचा ऐतिहासिक आणि अध्यात्मिक आढावा घेतला. महात्मा गौतम बुद्ध भारत आणि जपान यांना जोडणारा मजबूत धागा आहे. गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानात जगाच्या सर्व समस्या सोडवण्याचे सामर्थ्य आहे, असे मोदी म्हणाले.

    – काम करून पुढे जाणे

    भारत आणि जपान यांच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारशामध्ये विविध देवतांची साम्यस्थळे देखील पंतप्रधान मोदींनी उलगडून दाखवली. पण या सर्वांमध्ये भारतीय समुदायाने जय श्रीराम आणि काशी विश्वनाथ धाम संदर्भात या घोषणा दिल्या होत्या, त्याचा उल्लेख देखील मोदींनी आपल्या भाषणात केला नाही. किंबहुना जे काम आधीच पुढे सरकले आहे, असे आयोध्येचे राम मंदिर आणि जो विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे त्या ज्ञानवापी मशिद वादासंदर्भात बोलण्याची गरजच नाही, असे जर पंतप्रधान मोदींनी दाखवून दिले. प्रत्यक्ष काम करून आपण पुढे गेले पाहिजे हा वस्तुपाठ मोदींच्या भाषणातून दिसला.

    Grateful to the Indian community in Japan for their warm reception. Addressing a programme in Tokyo.

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य