- मोदींची एक झलक पाहण्यासाठी भारतीय समुदायाची मोठी गर्दी
विशेष प्रतिनिधी
दुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री उशीरा दुबईला पोहोचले. जिथे भारतीय समुदायाने त्यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदी आज (शुक्रवारी) जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत (COP28) सहभागी होणार आहेत.Grand welcome to Prime Minister Modi in Dubai Participate in the Global Climate Action Summit
दुबईत मोदींची एक झलक पाहण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. तसेच ‘सारे जहाँ से अच्छा’ गाऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दुबईला पोहोचल्यानंतर मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.
पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले की, “COP-28 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी दुबईला पोहोचलो आहे. शिखर परिषदेच्या कार्यवाहीची वाट पाहत आहे, ज्याचा उद्देश एक चांगला ग्रह तयार करणे आहे.” यासोबतच दुबईत भारतीय समुदायाने केलेल्या स्वागताचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. ते म्हणाले की, भारतीय समुदायाचा पाठिंबा आणि उत्साह हा आपल्या संस्कृतीचा आणि दृढ संबंधांचा पुरावा आहे.
Grand welcome to Prime Minister Modi in Dubai Participate in the Global Climate Action Summit
महत्वाच्या बातम्या
- Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार? भाजपची कायम राहणार सत्ता! पाहा महानिकालाचा अंदाज
- Rajasthan Exit Poll : राजस्थानात भाजपची सत्ता, जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेसची निराशा
- आता ‘या’ राज्यात पेपरफुटीप्रकरणी जन्मठेप आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड!
- म्यानमारमधून मिझोराममध्ये पळून आलेल्या आणखी 30 सैनिकांना मायदेशी परत पाठवले