• Download App
    भव्य दिव्य संसद भवनाचे उद्घाटन, यज्ञ हवन सर्वधर्मीय प्रार्थना; पवित्र सेंगोल राजदंडाचीही प्रस्थापना!!|Grand Divya Sansad Bhavan, Yajna Havan Interfaith Prayer; Installation of the Holy Sengol Scepter!!

    भव्य दिव्य संसद भवनाचे उद्घाटन, यज्ञ हवन सर्वधर्मीय प्रार्थना; पवित्र सेंगोल राजदंडाचीही प्रस्थापना!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 28 मे 2023 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनी भव्य दिव्य संसद भवनाचे उद्घाटन यज्ञ हवन, सर्वधर्मीय प्रार्थना आणि पवित्र सेंगोल राजदंडाचे प्रस्थापना याद्वारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. बरोबर सकाळी 7.15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हवनविधी सुरू झाला. त्यानंतर पंतप्रधानांनी साष्टांग दंडवत घालत सेंगोलचे दर्शन घेतले. आणि नव्या संसदेचे लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सेंगोल (राजदंड)ची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व धर्मीयांची प्रार्थना झाली.Grand Divya Sansad Bhavan, Yajna Havan Interfaith Prayer; Installation of the Holy Sengol Scepter!!

    बरोबर सकाळी 7.15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी साष्टांग दंडवत घालत सेंगोलचं दर्शन घेतलं. अधिनम मठाच्या संतांनी हा सेंगोल मोदी यांच्या हस्ते सुपूर्द केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकसभा अध्यक्षांच्या उजव्या हाताला मंत्रोच्चारात सेंगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पंतप्रधांनांनी सर्व सांधूसंत आणि धार्मिक गुरुंना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.



    कामगारांचा सत्कार

    या सोहळ्यानंतर मोदी यांनी कामगारांचा सत्कार केला. त्यानंतर संसदेच्या प्रांगणातच सर्व धर्मीय प्रार्थना झाल्या. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवर या प्रार्थना सभेला उपस्थित होते. अत्यंत धार्मिक आणि पवित्र वातावरणात हा सोहळा झाला.

    गांधींना अभिवादन

    कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनात आले. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पूजाविधीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशातील अनेक राज्यातील मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

    यांचा विरोध

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसदेचं उद्घाटन करण्यात येणार नसल्याने 21 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेससह टीएमसी, डीएमके, आप, राष्ट्रवादी पार्टी, ठाकरे गट, समजावादी पार्टी, आरजेडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, सीपीआय, इंडियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस (मणि) राष्ट्रीय लोकदल, रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी, व्हिसीके, एमडीएके आदींनी बहिष्कार टाकला आहे.

    यांचा पाठिंबा

    नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला 25 राजकीय पक्ष उपस्थित होते. या सोहळ्याला भाजप, शिवसेना (शिंदे), नॅशनल पीपुल्स पार्टी मेघालय, नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी, सिक्किम क्रांतिकारी मोर्चा, जन नायक पार्टी एआईडीएमके, आईएमकेएमके, एजेएसयू, आरपीआय, मिजो नॅशनल फ्रंट, तमिल मानिला काँग्रेस, आयटीएफटी, बोडो पीपुल्स पार्टी पट्टाली मक्कल काची, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी, अपना दल, असम गण परिषद, लोक जनशक्ति पार्टी (पासवान), बीजेडी, बीएसपी, टीडीपी, वायएसआरपीसी, अकाली दल आणि जेडीएस आदी पक्षाचे नेते उपस्थित होते.

    Grand Divya Sansad Bhavan, Yajna Havan Interfaith Prayer; Installation of the Holy Sengol Scepter!!

     

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते