अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 31 जानेवारी रोजी होणाऱ्या 64वा ग्रॅमी अवॉर्ड्स (Grammy Awards Postponed) सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे. ग्रॅमी पुरस्कार हा सर्वात मोठा वार्षिक संगीत पुरस्कार सोहळा आहे. दरवर्षी या पुरस्कार वितरणाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये नामवंत कलाकारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे सन्मानित केले जाते. Grammy Awards Postponed: Omicron hits 64th Grammy Awards! Postponed award ceremony in January.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली: अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 31 जानेवारी रोजी होणारा 64वा ग्रॅमी अवॉर्ड्स (Grammy Awards) सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. पुढची परिस्थिती लक्षात घेऊन लवकरच या कार्यक्रमाचे पुन्हा आयोजन करण्यात येणार आहे.
बुधवारी एका घोषणेमध्ये, रेकॉर्डिंग अकादमीने सांगितले की, लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियाचे अधिकारी, आरोग्य तज्ञ, कलाकार समुदाय आणि त्याचे भागीदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
‘द रेकॉर्डिंग अकादमी’ने या प्रकरणाबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता 31 जानेवारीला हा सोहळा आयोजित करण्यात मोठा धोका आहे. शहर आणि राज्य अधिकारी, आरोग्य आणि सुरक्षा तज्ञ, कलाकार समुदाय आणि आमच्या अनेक भागीदारांशी झालेल्या चर्चेनंतर, रेकॉर्डिंग अकादमी आणि CBS ने 64वा ग्रॅमी अवॉर्ड शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही संगीताची आतापर्यंतची सर्वात मोठी रात्र साजरी करण्यास उत्सुक आहोत. या सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.’
Grammy Awards Postponed: Omicron hits 64th Grammy Awards! Postponed award ceremony in January.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदी विजेंद्र सिंह यांची नियुक्ती
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण; ट्वीट करत याबाबत माहिती
- HOME ISOLATION : केंद्र सरकारकडून होम आयसोलेशनचे नवीन नियम जाहीर – जाणून घ्या सविस्तर
- PURANDAR AIRPORT : महाविकासआघाडी सरकारला धक्का! संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर विमानतळाच्या जागेची मान्यता रद्द
- “आमच्यावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देत बसू नका , तर …..” ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे