वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कॉल करणाऱ्याचे नाव मोबाइलच्या स्क्रीनवर दाखवणारी सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे. ट्रायने शुक्रवारी ‘कॉलिंग नेम प्रेझेंटेशन’ (सीएनएपी) पूरक सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.Govt’s New Mobile Caller ID Service Coming Soon; Directives of Telecom Regulatory Authority of India
दूरसंचार कंपन्या ग्राहकांच्या विनंतीवरून ही सुविधा देतील. सरकारने विशिष्ट तारखेनंतर देशात विक्री होणाऱ्या फोनमध्ये ही सुविधा देण्यासाठी कंपन्यांना सूचना द्यावी, असे ट्रायचे म्हणणे आहे.
मोबाइल कनेक्शन घेताना दिल्या जाणाऱ्या ग्राहक अर्जातील नाव व ओळखीचा वापर सीएनएपी सेवेसाठी केला जाऊ शकतो. देशातील स्मार्टफोन टूल, ट्रूकॉलर व भारत कॉलरसारखे अॅप कॉल करणाऱ्याची ओळख व स्पॅमची ओळख अशी सुविधा देतात, परंतु या सेवा लोकांकडून संकलित केलेल्या डेटावर आधारित आहेत. त्या नेहमी विश्वासार्ह नसतात. ट्रायने यासंबंधी नोव्हेंबर 2022 मध्ये याविषयी जनता, उद्योगांकडून शिफारशी मागवल्या होत्या.