• Download App
    सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना केंद्राचा मोठा दिलासा, ईसीएलजीएस’ची व्याप्ती वाढविली Govt. will support MSME by package

    सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना केंद्राचा मोठा दिलासा, ईसीएलजीएस’ची व्याप्ती वाढविली

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – कोरोनामुळे केंद्र सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीमची (ईसीएलजीएस) व्याप्ती वाढविली असून या कर्ज योजनेचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत किंवा तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप होईपर्यंत राहणार आहे, सरकारच्या या निर्णयामुळे व्यक्ती; तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. Govt. will support MSME by package

    केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाने विस्तारित ‘ईसीएलजीएस ४.०’चा आराखडा जाहीर केला आहे. सरकारने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मदत म्हणून, तसेच रोजगार सुरक्षित राहावेत, व्यावसायिक कामकाज पुन्हा सुरळीतपणे सुरु करता यावे आणि अत्यावश्यक आरोग्यसेवांसाठी पुरेसे अर्थसाह्य पुरविण्यासाठी ‘ईसीएलजीएस’मध्ये बदलांची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

    कोरोनाच्या साथीचा फटका साऱ्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सरकार त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे. छोट्या उद्योगांना मदत करण्याच्या हेतूने सरकारने हे पाउल उचलले असून त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे.

    Govt. will support MSME by package

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले

    Colonel Sophia कर्नल सोफिया म्हणाल्या- पाकिस्तान नागरिकांचा ढाल म्हणून वापर करतोय; 400 ड्रोन उडवले

    BCCI : भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL-2025 स्थगित; BCCI ने घेतला मोठा निर्णय