• Download App
    काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल |Govt will set transit camp in Baramulla for Kashmiri Pandits

    काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल

    विशेष प्रतिनिधी

    बारामुल्ला – काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यानुसार बारामुल्ला येथे ४० कोटी रुपये खर्च करून ट्रान्झिट कॅम्प उभारण्यात येईल.Govt will set transit camp in Baramulla for Kashmiri Pandits

    काश्मीर खोऱ्यातून हजारो काश्मिरी पंडितांना अत्याचारामुळे विस्थापित व्हावे लागले होते. हे पडित सध्या जम्मूसह देशाच्या विविध भागांत विस्तपिताचे जिणे जगत आहेत. आपल्या मातृभुमीत परतण्याची त्यातील अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने हे महत्वाचे पाउल टाकले आहे.



    केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याहस्ते या कामाचे भूमीपूजन झाले. या छावणीत ३३६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येईल. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बारामुल्ला आणि काश्मीरची जनता सहकार्य करीत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

    सोनोवाल म्हणाले, काश्मीरमध्ये परतण्याची आणि येथे शांततेने राहण्याची इच्छा असलेल्या काश्मिरी पंडितांसाठी ही छावणी आहे. ती बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचा मी आभारी आहे. काश्मिरी पंडितांनी परत यावे अशी काश्मिरी जनतेची सुद्धा इच्छा आहे. लोकांच्या इच्छेनुसारच संक्रमण छावणी बांधण्यात येत आहे.

    Govt will set transit camp in Baramulla for Kashmiri Pandits

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला