• Download App
    ‘पँडोरा पेपर्स’ प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई, केंद्र सरकारचा निर्वाळा |Govt. will enquire Pandora papers

    ‘पँडोरा पेपर्स’ प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार कारवाई, केंद्र सरकारचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – विदेशांमध्ये संपत्ती दडवून ठेवल्यांची नावे उघड करणाऱ्या ‘पँडोरा पेपर्स’मध्ये सुमारे तीनशे भारतीयांची नावे आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे अर्थमंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.Govt. will enquire Pandora papers

    जगभरातील अनेक नेते गेल्या अनेक वर्षांपासून करसवलत असलेल्या देशांमध्ये संपत्ती लपवून ठेवत आहेत, असा खळबळजनक दावा ‘पँडोरा पेपर्स’ या जगभरातील पत्रकारांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय गटाने केला आहे.



    ‘सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे. तपास संस्थांच्या मार्फत तपास करून योग्य कारवाई केली जाईल. तपास वेगाने आणि प्रभावीपणे होण्यासाठी इतर देशांमधील तपास संस्थांशीही संपर्क साधला जाईल,’ असे निवेदनात म्हटले आहे.

    Govt. will enquire Pandora papers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच

    UPSC : UPSC ची नवीन प्रणाली- IAS-IPS च्या कॅडर वाटपाचे नियम बदलले, 25 कॅडरचे 4 गटांमध्ये विभाजन, भौगोलिक झोन रद्द