विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता नवा पर्याय पुढे केला आहे. त्यानुसार पीएम केअर फंडातील निधीतून एक लाख ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले जाणार आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात ऑक्सिसजनचा गंभीर तुटवडा निर्माण झाला Govt. will buy one lakh concentrators from PM care fund
असून यावर तोडगा काढण्यासाठी केंद्राने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यासाठी पुढाकार घेतला असून या खरेदीला हिरवा कंदील दर्शविला. या मेगा खरेदीमुळे देशभरातील रुग्णालयांना जाणवणारा ऑक्सिजनचा दुष्काळ कमी होईल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली आहे.
- महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्सच्या मुकेश अंबानींकडून प्राणवायू, दररोज ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा
डेहराडून येथील सीएसआयआरशी संबंधित भारतीय पेट्रोलियम संस्थेतर्फेही १२० ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याशिवाय देशात ठिकठिकाणी असलेल्या लष्करी रुग्णालयांमध्येही कोरोनासाठी उपचार केंद्रे त्वरित सुरू करण्यात येणार आहेत.
पीएम केअर फंडातून ५५१ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यास यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतच हा निर्णय घेण्यात आला. या कॉन्सन्ट्रेटरचे देशभरात तातडीने वितरण करण्यात यावे, अशा सूचनाही पंतप्रधानांनी बैठकीत दिल्या.
Govt. will buy one lakh concentrators from PM care fund
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलंय, गिरीष महाजन यांचा आरोप
- अक्षय कुमार- ट्विंकल खन्नाचा मदतीचा हात, १०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर करणार दान
- भारतीय कोव्हॅक्सिन लई भारी, विषाणूचे ६१७ प्रकार नष्ट करण्याची क्षमता, जयराम रमेश, शशी थरूर तोंडावर पडले
- परमवीर सिंग याना अडविण्याचा असाही डाव, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल