• Download App
    आता मुलांनाही कोरोना लस लवकर मिळण्यासाठी सरकारचे वेगवान प्रयत्न |Govt. planning for vaccination in all age group

    आता मुलांनाही कोरोना लस लवकर मिळण्यासाठी सरकारचे वेगवान प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय मोहीमेला गती आलेली असतानाच आता १२ ते १८ वयोगटातील मुलांनाही कोरोना लस लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकारने वेगवान प्रयत्न सुरू केले आहेत.Govt. planning for vaccination in all age group

    देशभरात लसीकरणाला वेग आला आहे. १८ वर्षांच्या पुढील ७० टक्के लोकांनी किमान १ डोस घेतला आहे. मात्र आकडेवारीनुसार देशातील सुमारे ४४ कोटी किशोरवयीन मुलांचे लसीकरण अद्याप बाकी आहे.



    याबाबत तज्ञांनी सांगितल की मुलांचे लसीकरण सुरू झाल्यावर काही ना काही आजार असलेल्या मुलांचे लसीकरण करण्यास सरकारचे प्राधान्य राहील. ही मुले सुरक्षित झाल्यावर १२ वर्षांपुढील मुलांची लसीकरणाची मोहीम वेगवान करण्यात येईल.

    प्रत्येक मुलाला लसीकरण झाले पाहिजे व त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालाकांना फार दूर जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी घेण्यात येईल. भारतीय औषध महानियंत्रकांनी झायडस कॅंडीला लसीला ऑगस्टमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती.

    ही लस १२ वर्षांपुढील सर्व मुलांनाही दिली जाईल. यासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्याही मुलांवरील चाचण्या सध्या सुरू आहेत व पुढच्या आठवड्यापर्यंत याचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

    Govt. planning for vaccination in all age group

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच