vaccines rs 150 per dose : 1 मेपासून देशातील कोरोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मिती कोव्हिशील्ड लसीच्या वेगवेगळ्या दरांमुळे वाद उभा राहिला होता. केंद्रासाठी 150 रुपयांनी मिळालेली लस, राज्यांना 400 रुपयांना का? असा सवाल विचारण्यात येत होता. Govt of Indias procure vaccines rs 150 per dose will provide states totally free
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 1 मेपासून देशातील कोरोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मिती कोव्हिशील्ड लसीच्या वेगवेगळ्या दरांमुळे वाद उभा राहिला होता. केंद्रासाठी 150 रुपयांनी मिळालेली लस, राज्यांना 400 रुपयांना का? असा सवाल विचारण्यात येत होता.
यावर सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी म्हटले होते की, केंद्राशी 10 कोटी डोसचा करार झाला होता. या लसी तेव्हा 150 रुपयांना देण्याचे ठरले होते. परंतु हा करार संपल्यानंतर केंद्रालाही 400 रुपयांनीच लस देण्यात येणार आहे. तथापि, आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करून हे स्पष्ट केले आहे की, यापुढेही कोव्हिशील्डची लस केंद्र सरकार 150 रुपयांतच खरेदी करणार आहे, आणि राज्यांना ती मोफतच देण्यात येणार आहे.
लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आणि तिची व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने लस उत्पादकांना खुल्या बाजारात तसेच राज्य आणि खासगी रुग्णालयांमध्ये विक्री करण्यास मान्यता दिली आहे. तथापि, लस उत्पादक कंपन्यांना 50 टक्के उत्पादन केंद्राला द्यावे लागेल. आतापर्यंत लस कंपन्यांना इतरत्र विक्री करण्याची परवानगी नाही. केवळ ते केंद्र सरकारमार्फतच विकू शकत होते. केंद्र सरकार ती खरेदी करून राज्यांना पाठवत होते. दरम्यान, भारत बायोटेकने अद्याप त्यांच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीची किंमत जाहीर केलेली नाही.
गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याचे कारण म्हणजे आदार पूनावाला म्हणाले होते की, सुरुवातीच्या करारात केंद्राच्या लसीची एक डोस 150 रुपये होती, परंतु नवीन ऑर्डर मिळाल्यावर त्याची किंमत 400 रुपये होईल. यानंतर, कॉंग्रेस नेते जयराम नरेश यांनी शनिवारी लसीच्या वेगवेगळ्या दरांवरून प्रश्न विचारला. ते म्हणाले की, सरकारला नव्या कराराअंतर्गत डोससाठी 400 रुपये द्यावे लागले, तर अमेरिका, ब्रिटन, ईयू, सौदी, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षाही जास्त किंमत सरकारला मोजावी लागेल.
कॉंग्रेसच्या नेत्याच्या या ट्विटवर मंत्रालयाने उत्तर दिले की केंद्र सरकार कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी 150 रुपये दरानेच विकत घेईल आणि राज्ये नि:शुल्क पुरवठा करत राहील. यानंतर जयराम नरेश यांनी पुन्हा ट्विट केले की, सत्य काय आहे? तथापि, राज्यांनी लसीकरणाची गती वाढविल्यामुळे लसीच्या तुटवड्याच्या बातम्या अनेक ठिकाणांहून येऊ लागल्या. यानंतर सरकारने निर्णय घेतला की, राज्य आणि खासगी रुग्णालयेदेखील थेट कंपनीकडून लस खरेदी करू शकतील.
Govt of Indias procure vaccines rs 150 per dose will provide states totally free
महत्त्वाच्या बातम्या
- Delhi Oxygen Crisis : ऑक्सिजनअभावी दिल्लीत 20 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा जास्त रुग्णाचा जीव टांगणीला
- Inspiring : कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी गुरुद्वाराचा पुढाकार, ‘ऑक्सिजन लंगर’मुळे वाचताहेत हजारोंचे प्राण
- एन. व्ही. रमना बनले ४८वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास
- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण, तिहारच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात कैद आहे कुख्यात गँगस्टर
- कोरोनाचा हाहाकार : देशात एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक 3.46 लाख रुग्णांची नोंद, 2624 जणांचा मृत्यू