कृषी कायद्यांविषयी विरोधकांमध्येच संभ्रम; त्यांचीच भूमिका गोंधळाची; केंद्रीय कृषिमंत्र्यांचा हल्लाबोल
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याबाबत बर्याच दिवसांनी सरकारच्या वतीने कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज बाजू मांडली. Govt is wholly transparent regarding the farm laws. We discussed the issue for 4 hours in Lok Sabha and Rajya Sabha
कृषी कायद्यांच्या संदर्भात विरोधी पक्षांमध्ये संभ्रम आहे. त्यांच्यात कोणतीच एकवाक्यता नाही. काही विरोधक म्हणतात, कृषी कायदे सगळे रद्द करावेत. काहींना त्यामध्ये फक्त सुधारणा हव्या आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नाही. सरकार कृषी कायद्याबाबत सर्व शंकांचे निरसन करायला तयार आहे. अनेकदा शंकांचे निरसन देखील केले आहे. परंतु विरोधकांची भूमिकाच गोंधळाची आहे, असे नरेंद्र सिंग तोमर यांनी संसदेत स्पष्ट केले.
लोकसभेत कृषी विधेयकांवर कायद्यांवर चार तास चर्चा झाली. ज्या सदस्यांनी प्रश्न विचारले त्या सर्वांची उत्तरे देण्यात आली आहेत. शेतकरी आंदोलकांशी सरकार चर्चेला तयार आहे. परंतु विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्याने ते फक्त मोदी सरकारने कायदे आणल्यामुळे या कायद्यांना विरोध करत आहेत, असा आरोप तोमर यांनी केला.
बर्याच दिवसांनी कृषिमंत्र्यांनी सरकारची बाजू संसदेत आणि संसदेबाहेर देखील मांडली. आज दुपारी काँग्रेसचे खासदार आणि अकाली दलाचे खासदार यांच्यात संसदेबाहेर कृषी कायद्याच्या मुद्द्यावर हमरीतुमरी झाली. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कृषी कायद्यांची बाजू उचलून धरण्याचा आरोप केला. हरसिमरत कौर बादल या मंत्री असताना कृषी कायद्यांविरोधात बोलल्या नाहीत, असा आरोप पंजाबमधल्या काँग्रेसच्या खासदारांनी केला. तर कृषी कायदे संमत होताना काँग्रेसचे खासदार झोपले होते का?, असा सवाल हरसिमरत कौर बादल यांनी केला.
काँग्रेस आणि अकाली दल यांच्यातील हमरीतुमरीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी लोकसभेत कृषी कायद्यांवर चार तास चर्चा झाल्याचे सांगून एक प्रकारे दोन्ही पक्षांना राजकीयदृष्ट्या छेडले. कारण मोदी सरकार विरोधात विरोधकांनी जे रान पेटवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामध्ये कृषी कायदे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकार कृषी कायद्यांवर लोकसभेत चार तास चर्चा करते. त्यावेळी विरोधक सदनात हजर राहत नाहीत. ते संसदेबाहेर राहून फक्त गोंधळ करतात, असेच कृषिमंत्र्यांनी सूचकपणे स्पष्ट केले.
Govt is wholly transparent regarding the farm laws. We discussed the issue for 4 hours in Lok Sabha and Rajya Sabha
महत्त्वाच्या बातम्या
- Remdesivir : जूनमध्ये भारताची रेमडेसिविर उत्पादन क्षमता वाढून 122.49 लाख कुप्या प्रति महिना झाली, केंद्र सरकारची माहिती
- आयटी क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस : भारतीय आयटी कंपन्यांकडून 5 वर्षांतील उच्चांकी भरती, पहिल्या सहामाहीतच 1.21 लाख जणांना रोजगार
- पावसाळी अधिवेशन : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई, तृणमूलचे सहा खासदार दिवसभरासाठी निलंबित
- अँटिलिया केस : NIAने चार्जशीट दाखल करण्यासाठी मागितली 1 महिन्याची अतिरिक्त वेळ, साक्षीदारांना मिळताहेत धमक्या
- संसद परिसरात भिडले पंजाबातील काँग्रेस आणि अकाली दलाचे खासदार, कृषी कायद्यांवरून झाला जोरदार वाद