विशेष प्रतिनिधी
शिमला : हिमाचल प्रदेशात बहुमत असूनही काँग्रेसचे आमदारांनी बंडखोरी केली आहे. 9 आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार संकटात सापडले आहे. 6 काँग्रेस आणि 3 अपक्ष आमदारांनी भाजपच्या बाजूने क्रॉस व्होट केले.Govt in crisis in Himachal; BJP MLAs met Governor; 3 demands made with floor test
यासंदर्भात बुधवारी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांनी राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदनही दिले. भाजप आमदारांनी सभागृहात फ्लोअर टेस्ट, कट मोशन आणि आर्थिक विधेयकावर मतविभागणीची मागणी केली.
विरोधकांच्या मागणीवर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगितल्यावर सखू सरकार इथेच अडकून पडू शकते, कारण काँग्रेसकडे आता बहुमत दिसत नाही. राज्यसभेतील खासदारांच्या मतदानानुसार काँग्रेसकडे 34 मते आहेत. त्यातही सभापती व उपसभापतींना मतदान करता येत नाही. अशा वेळी काँग्रेसकडे केवळ 32 मते उरली आहेत.
या दृष्टीने भाजपकडे आता संख्याबळ जास्त असल्याचे दिसते. काँग्रेससाठी दिलासा देणारी बाब म्हणजे पक्षांतर विरोधी कायदा पक्षाच्या आमदारांना सरकारविरोधात मतदान करू देत नाही.
दुसरीकडे हिमाचलबाबत काँग्रेस हायकमांड सक्रिय झाली आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर संकट सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही नेते आज शिमल्याला पोहोचू शकतात. बंडखोर आमदारांना मुख्यमंत्री बदलण्याची इच्छा आहे.
दरम्यान, हिमाचलच्या डीजीपींनी शिमल्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. इतर जिल्ह्यातून राखीव बटालियन मागवण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्प मंजूर करण्याचे आव्हान सरकारसमोर
फ्लोअर टेस्टपूर्वी हिमाचल सरकारसमोर 2024-25 या आर्थिक वर्षाचे बजेट पास करण्याचे मोठे आव्हान आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार उद्या म्हणजेच 29 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सभागृहात मंजूर करायचा आहे. पण सरकार आजही ते पारित करण्यासाठी सभागृहात आणू शकते.
जाणकारांच्या मते, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी निःसंशयपणे विरोधी मतदान केले आहे, परंतु अर्थसंकल्प मंजूर करताना ते विरोधी मतदान करू शकणार नाहीत, कारण मुख्य व्हीपने यापूर्वीच व्हीप जारी केला आहे. याचे उल्लंघन झाल्यास पक्ष आमदारांवर कारवाई करू शकतो.
या आमदारांनी केले क्रॉस व्होटिंग
काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुजानपूरचे राजेंद्र राणा, धर्मशालाचे सुधीर शर्मा, कुतलाहारचे देवेंद्र भुट्टो, बडसरचे आयडी लखनपाल, लाहौल-स्पितीचे रवी ठाकूर आणि गाग्रेटचे चैतन्य शर्मा यांनी क्रॉस व्होट केले आहे. त्याचप्रमाणे अपक्ष देहरा होशियार सिंग, नालागढमधील केएल ठाकूर आणि हमीरपूरमधील आशिष शर्मा यांनीही भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केले.
Govt in crisis in Himachal; BJP MLAs met Governor; 3 demands made with floor test
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!
- CAA मार्चमध्ये लागू होणार? ; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा घेणार निर्णय!
- EDने केजरीवालांना पाठवले आठवे समन्स, ‘या’ दिवशी चौकशीसाठी बोलावले
- शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!