विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आता ‘दो गज की दुरी’ देखील पुरेशी ठरणार नाही.कारण खोकला किंवा शिंकेद्वारे बाहेर पडणाऱ्या थेंबांमधूनच कोरोनाचा विषाणू १० मीटरपर्यंत पसरू शकतो,Govt directs new guideline for corona
असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. सध्या लस आली असली तरीदेखील दुहेरी मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतरभान पाळणे हे यापुढे आवश्यसक असल्याचे आज केंद्र सरकारकडून देखील सांगण्यात आले.
मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्या कार्यालयाकडून आज महामारीबाबत हे नवे ‘इझी टू फॉलो’ दिशानिर्देश जारी करण्यात आले असून त्यानुसार कोरोना हा विषाणू असल्याने त्याचा हवेतून वेगाने प्रसार होतो,
असे सांगण्यात आले. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रत्येकाने नियमांचे कोटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे या दिशा निर्देशांत म्हटले आहे.
माणसाचा खोकला व शिंकेतून जे सूक्ष्म थेंब किंवा कण (एअरोसोल ) जमिनीवर पसरतात त्या वाटेही कोरोना माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकतो, असा गंभीर इशारा संशोधकांकडून देण्यात आला आहे.
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी दुहेरी मास्क आणि बाहेर पडल्यानंतर सामाजिक सुरक्षित अंतर भान पाळणे हेच प्रमुख उपाय सध्यातरी दिसून येत आहेत.
याशिवाय साफसफाई आणि व्हेंटिलेशन यांनाही तितकेच महत्त्व असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या नाका तोंडातून जे कण बाहेर पडतात त्याच्यापासून स्वत:चा बचाव करणे गरजेचे आहे
Govt directs new guideline for corona
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाची वाढ, सततचे संघर्ष आणि आपत्तींमुळे विस्थापितांच्या संख्येत विक्रमी वाढ
- Gadchiroli Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू, 13 नक्षलवादांचा खात्मा
- मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, येचुरी यांची सपशेल माघार
- ‘टिकटॉक’चे सीइओ झांग यिमिंग यांचा राजीनामा, अमेरेकिच्या दबावामुळे निर्णयाची चर्चा
- तब्बल १७० किलोमीटर लांबीचा प्रचंड हिमनग अंटार्क्टिका खंडापासून विलग, तापमानवाढीचा परिणाम