अधिकारी गोविंद हे सध्याचे सचिव भल्ला यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या पदाची सूत्रे हाती घेतील
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी गोविंद मोहन यांची बुधवारी अजय कुमार भल्ला यांच्या जागी केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी गोविंद हे सध्याचे सचिव भल्ला यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या पदाची सूत्रे हाती घेतील, अशी माहिती एका अधिकृत आदेशात देण्यात आली आहे.
गोविंद हे सध्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव आहेत. ते गृह मंत्रालयात विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून कार्यभार स्वीकारतील. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मोहन यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे.
”मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गोविंद मोहन, IAS (सिक्कीम: 1989), सचिव, सांस्कृतिक मंत्रालय, यांची गृह मंत्रालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. मोहन त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अजय कुमार भल्ला, IAS (आसाम-मेघालय: 1984) यांच्या जागी 22 ऑगस्ट रोजी गृह मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारतील,” असे आदेशात म्हटले आहे.
मोहन यांनी BHU मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले आहे आणि ऑक्टोबर 2021 पासून त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक सचिव म्हणून काम केले आहे. यापूर्वीही त्यांनी दोनदा गृहमंत्रालयात काम केले आहे.
Govind Mohan appointed as Union Home Secretary
महत्वाच्या बातम्या
- Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल!
- Saket Gokhale : ‘टीएमसी’ खासदार साकेत गोखले यांच्या अडचणीत वाढ!
- Arvind Kejriwal : न्यायालयाकडून अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ!
- S Jaishankar :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत एस जयशंकर यांचे वक्तव्य, म्हणाले…