विशेष प्रतिनिधी
कोलकता : निवडणुकीनंतरच्या हिंसाचारामुळे पश्चिम बंगालमधील स्थिती भयंकर बनल्याचे मत राज्यपाल जगदीप धनकर यांनी व्यक्त केले. धनकर यांनी उत्तर बंगालचा तब्बल एका आठवड्याचा दौरा सुरु केला. पहिल्याच दिवसी त्यांनी ममता यांच्या नेतृत्वाखालील सरकारला धारेवर धरले.
ते म्हणाले, हिंसाचारामुळे मी चिंतित आहे. हे मान्य होण्यासारखे नाही. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे लोकशाही व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Governor targets Mammata Banaerjee
धनकर यांनी त्यांनी उत्तर बंगालचा दौरा करण्याला महत्त्वाचा संदर्भ आहे. दौऱ्याच्या उद्देशांबाबत त्यांनी कोणताही तपशील दिलेला नाही, पण हा भाग केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी भाजपच्या काही खासदारांनी केली आहे. हिंसाचाराच्या तक्रारींची हाताळणी करण्याच्या पद्धतीवर त्यांनी टीका केली. इतके आठवडे उलटून गेले तरी सरकारचा सत्य नाकारण्याचाच दृष्टिकोन आहे, असा दावा त्यांनी केला. मतदानाच्यावेळी हिंसाचार झालेल्या ठिकाणांचा धनकर यांनी निवडणूक निकालानंतर दौरा केला होता. तेव्हा उत्तर बंगालमधील कुचबिहार येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.
Governor targets Mammata Banaerjee
महत्त्वाच्या बातम्या
- म्यानमारमधील संघर्षांचा लाखो नागरिकांना फटका, लाखो जण देश सोडण्याच्या तयारीत
- राज्यात म्युकरमायकोसिस रूग्णसंख्या पोचली सात हजारांवर; ७२९ रूग्ण आजपर्यंत दगावले
- पवारांनी आजची बैठक सर्वपक्षीय नव्हे; समाजवादी, बसप, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष त्यात नाहीत; संजय राऊतांनी काढली बैठकीची हवा
- करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने ब्रिटनची उडाली झोप
- मुलीचे शाळेत अॅडमिशन नाही, बापाने ई-मेलद्वारे दिली चक्क मंत्रालय बॉम्बने उडविण्याची धमकी