• Download App
    काँग्रेसने सोडून दिलेला नरसिंह राव यांचा राजकीय वारसा तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसने उचललाय...!! Governor DrTamilisaiGuv and CM Sri KCR unveiling the statue of Sri #PVNarasimhaRao in Hyd

    काँग्रेसने सोडून दिलेला नरसिंह राव यांचा राजकीय वारसा तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसने उचललाय…!!

    वृत्तसंस्था

    हैदराबाद – “५० शब्दांचे ट्विट, ६२८ रिट्विट; माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी काँग्रेसजनांनी एवढीच आस्था दाखवून त्यांचा सोडून दिलेला राजकीय वारसा तेलंगणचे मुख्यमंत्री आणि तेलंगण राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी उचलला आहे. Governor DrTamilisaiGuv and CM Sri KCR unveiling the statue of Sri #PVNarasimhaRao in Hyd

    त्यांनी हैदराबादमध्ये आज तेलंगण सरकारतर्फे नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दीची सांगता जोमदार केली. हैदराबाद राजभवनाजवळच्या नेकलेस रोडवरील एका मार्गाला नरसिंह रावांचे नाव दिले. तेथील पार्कमध्ये राव यांचा १६ फूटी पुतळा उभारला आहे. त्याचे अनावरण आज तेलंगणच्या राज्यपाल तमिळसाई सुंदरम यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी राज्यपाल सुंदरम आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नरसिंह राव यांचे समाधीस्थळ ज्ञानभूमी येथे जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

    काँग्रेसच्या कोणत्याही केंद्रीय नेत्याने आस्था न दाखविल्याने तेलंगणमधील काँग्रेस नेत्यांनी देखील या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. पण त्यामुळेच चंद्रशेखर राव यांनी गेले वर्षभर नरसिंह राव यांची जन्मशताब्दी विविध शासकीय कार्यक्रम करून साजरी केली.

    नरसिंह राव यांचा राजकीय वारसा काँग्रेसला जरी नको असला, तरी ते तेलुगु बिड्डा अर्थात तेलुगु भूमिपुत्र असल्याने चंद्रशेखर राव यांनी तो वारसा चांगलाच उचलून धरला आहे.

    Governor DrTamilisaiGuv and CM Sri KCR unveiling the statue of Sri #PVNarasimhaRao in Hyd

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!