• Download App
    राष्ट्रहितासाठी सरकार कोणताही धोका घेण्यास तयार; पंतप्रधान मोदी यांची उद्योग संघटनेच्या बैठकीत ग्वाही Government willing to take any risks for National interest ; Prime Minister Modi's testimony at the meeting of his industry association

    राष्ट्रहितासाठी सरकार कोणताही धोका घेण्यास तयार; पंतप्रधान मोदी यांची उद्योग संघटनेच्या बैठकीत ग्वाही

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाच्या विकासात उद्योगांचे मोठे योगदान असून उद्योगांमुळे अर्थव्यवस्था भरारी घेईल, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला असून राष्ट्रहितासाठी सरकार कोणताही धोका घेण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Government willing to take any risks for National interest ; Prime Minister Modi’s testimony at the meeting of his industry association

    भारतीय उद्योग संघाच्या (सीआईआई) वार्षिक बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. ही बैठक व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे झाली.
    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली होती. ते म्हणाले, उद्योगांमुळे भारत आर्थिक प्रगतीच्या दिशेने, अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी निश्चित वाटचाल करेल. भविष्यामध्ये एक दिवस असा यायला हवा की, कोणत्याही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला नव्या संधी, नोकऱ्या नाहीत, असे सांगावे लागणार नाही.

    सरकार रिस्क घेण्यास तयार

    राष्ट्रहिताच्या दृष्टीने सरकार कोणतीही रिस्क घेण्यास तयार आहे. राजकीय हित धोक्यात येईल, या पोटी विरोधकांनी जीएसटीचा निर्णय घेताना काचकूच केली. परंतु आम्ही धोका पत्करून हा निर्णय घेतला. हा निर्णय राष्ट्रहिताचा होता. आज रेकॉर्ड ब्रेक जीएसटीचे संकलन होत आहे. यापूर्वी परदेशी गोष्टी चांगल्या अशी हाकाटी पिटली जात असे. आता परिस्थिती बदलली असून भारतीय ब्रॅण्डही चांगले असतात, गे स्पष्ट झाले आहे. आज जगभरात भारतीय ब्रँड चांगले असल्याचे मानले जात आहे.

    मेड इन इंडिया उत्पादनांवर विश्वास

    अआज तमाम भारतीयांचा मेड इन इंडिया उत्पादनांवर विश्वास वाढला आहे. ती कंपनी भलेही भारतीय नसली तरी भारतात उत्पादन होत असल्याचा त्यांना अभिमान वाटतो आहे, असे मोदी म्हणाले.

    पंतप्रधान काय म्हणाले..

    •  देशी कृषी बाजार परदेशी बाजारपेठेशी जोडणार
    •  भारतात गुंतवणूक करण्यास अनेक देशांचा पुढाकार
    •  उद्योग धंद्यासाठी भारताची पत वाढली आहे
    •  भारतातील परकीय गंगाजळीत मोठी वाढ
    •  उद्योगांना आत्मनिर्भर करण्यावर भर देणार
    •  ऑलिम्पिक स्पर्धेत जो आत्मविश्वास दिसला तो स्टार्ट अँप मध्ये दिसत आहे

    Government willing to take any risks for National interest ; Prime Minister Modi’s testimony at the meeting of his industry association

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!