• Download App
    'डीपफेक'च्या विरोधात सरकार उचलणार कठोर पाऊल ; कडक नियम बनवण्याच्या तयारीत! Government will take strict action against Deepfake Preparing to make strict rules

    ‘डीपफेक’च्या विरोधात सरकार उचलणार कठोर पाऊल ; कडक नियम बनवण्याच्या तयारीत!

    डीपफेक तयार करणाऱ्या आणि होस्ट करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर दंड आकारला जाऊ शकतो

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘डीपफेक्स’ संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह बैठक घेतली. या बैठकीत गुगल, फेसबुक, यूट्यूबसह ऑनलाइन प्लॅटफॉर्मही उपस्थित होते. Government will take strict action against Deepfake Preparing to make strict rules

    या बैठकीनंतर केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या बैठकीत चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाले आहे. डीपफेक हा आज लोकशाहीसाठी नवीन धोका आहे आणि त्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज सरकारला वाटते. याबाबत केंद्र सरकार लवकरच नियम ठरवणार आहे. तसेच, याविरोधात लोकांमध्ये जागरूकता वाढवणे खूप गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते.


    सोशल मीडियावर आता अंकुश, गरज सभागृहात एकमत होण्याची गरज, अश्विनी वैष्णव यांची माहिती


    सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, डीपफेकमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही नियम बनवू. आज घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह पुढील बैठकी घेऊ.

    Government will take strict action against Deepfake Preparing to make strict rules

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!