वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विधानसभेत सादर केलेल्या पुरवणी बजेटमध्ये अनेक लोकप्रिय घोषणा तर केल्यास परंतु त्याहीपेक्षा त्यांनी उत्तर प्रदेशातल्या माफियांना जो दणका दिला आहे त्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. Government will build houses for the poor and Dalits on the confiscated land of the mafia.
उत्तर प्रदेशातील माफियांच्या मालमत्तांवर बुलडोजर चालून योगींनी त्यांना आधीच दणका दिला होता. आता याच माफियांच्या कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केलेल्या जमिनींवर उत्तर प्रदेश सरकार गरीब आणि दलितांसाठी पक्की घरे बांधणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत मांडलेल्या पुरवणी बजेटमध्ये या घरांचा च्या बांधकामासाठी तरतूद करण्यात आली आहे.
या खेरीज उत्तर प्रदेशाचा 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता अनेक लोकप्रिय घोषणाही केल्या आहेत. त्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 28 टक्क्यांची वाढ तसेच मोफत धान्य योजनेचे विस्तारीकरण आदी घोषणांचा समावेश आहे.
परंतु यातली सर्वात मोठी घोषणा ही माफियांच्या जप्त केलेल्या जमिनींवर गरीब आणि दलितांसाठी घरे बांधण्याची आहे. उत्तर प्रदेशात 2017 मध्ये योगी सरकार आल्यानंतर माफिया आणि गुंडांवर कायद्याचा बडगा चालविण्यात आला. मुख्तार अन्सारी, अतिक अहमद, आझम खान आदी माफियांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मालमत्ता कायदेशीर कारवाई करून बुलडोजरने पाडण्यात आल्या. तसेच त्यांनी व त्यांच्या टोळीतल्या अनेक गुंड – गुन्हेगारांनी बळकावलेल्या जमिनी योगी सरकारने कायदेशीर कारवाई करून राज्य सरकारच्या ताब्यात घेतल्या.
अशा सुमारे 65 हजार हेक्टर जमिनी सध्या राज्य सरकारच्या ताब्यात आहेत. या जमिनी वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. या जमिनींवर उत्तर प्रदेश सरकार गरीब आणि दलितांसाठी पक्की घरे बांधून देणार आहे. याची घोषणा आज योगींनी विधानसभेत केली आहे.
Government will build houses for the poor and Dalits on the confiscated land of the mafia.
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : ठाकरे सरकार अनिल देशमुखांना ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी लपवण्यात मश्गुल, किरीट सोमय्यांचा आरोप
- Bengal Post Poll Violence : ममतांच्या छत्रछायेखाली झालेल्या हिंसाचाराचा तपास सीबीआय करणार
- पुण्यातील नरेंद्र मोदी मंदिरातून पुतळा हटवला, थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून आला होता फोन
- शब्दबंदी : दोन राज्ये दोन निर्णय…!! एक राजकीय, दुसरा धर्मभावनेतून…!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या कोचला अयोध्येला येण्याचे निमंत्रण का दिले…?? वाचा…