• Download App
    केंद्रातील मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक ;५० लाख बॅरल राखीव साठा खुला करणार; इंधनाचे दर घसरण्याची शक्यताGovernment to open 50 lakh barrels of oilreserves; fuel prices Will fall

    केंद्रातील मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक ;५० लाख बॅरल राखीव साठा खुला करणार; इंधनाचे दर घसरण्याची शक्यता

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकार कच्च्या तेलाचा ५० लाख बॅरलचा राखीव साठा खुला करणार आहे.त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वाढली आहे. Government to open 50 lakh barrels of oilreserves; fuel prices Will fall

    पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महागाई वाढली आहे. राखीव इंधनाचा साठा खुला केल्याने सामान्य नागरिकांना इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.


    Petrol Price : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच, लवकरच भारतात पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त, जाणून घ्या आजचे दर


    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तेल उत्पादक संघटनेच्या (ओपेक) सदस्य देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्याची विनंती केली होती. मात्र, त्याकडे ‘ओपेक’ देशांनी काणाडोळा केला. ओपेक देशांच्या या धोरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने भारतासह जपान आणि चीन यांना इंधनाचा राखीव साठा वापरण्यास काढण्याचे आवाहन केले होते. त्यास भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला. जपानही या निर्णयासाठी अनुकूल असून चीनने निर्णय कळवलेला नाही.

    राखीव साठा म्हणजे काय?

    आपत्कालीन परिस्थितीत इंधनाची टंचाई भासू नये यासाठी प्रत्येक देशाकडे कच्च्या तेलाचा राखीव साठा असतो. इंधनाच्या वाढत्या किमतीवर तोडगा काढण्यासाठी राखीव साठा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथमच कच्च्या तेलाचा राखीव साठा वापरणार आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील तीन ठिकाणांवर हा साठा आहे.
    घरगुती गॅसवरील सबसिडी पुन्हा सुरू

    घरगुती गॅसवरील सबसिडी पुन्हा सुरू

    काेराेनाकाळात सबसिडी बंद हाेती. मात्र, आता ग्राहकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होत आहेत. सध्या नेमकी किती सबसिडी दिली आहे, हे स्पष्ट नाही.

    Government to open 50 lakh barrels of oilreserves; fuel prices Will fall

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक