• Download App
    केंद्र सरकारतर्फे राज्यांना आणखी १९२ लाख लशीचे डोस मोफत|Government Of Indian will provide 192 lakh Vaccine Dose's free to Sates

    आनंदाची बातमी : केंद्र सरकारतर्फे राज्यांना आणखी १९२ लाख लशीचे डोस मोफत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशीच्या १९१.९९ लाख डोस १६ ते ३१ मे या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली. Government Of Indian will provide 192 lakh Vaccine Dose’s free to Sates

    कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचे कसे वितरण होणार आहे, त्याचा तपशील अगोदर देण्यात येणार आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी संबंधित अधिकाऱ्यांना या लशींच्या वापराबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात



    आणि लशींचा अपव्यय होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.या १९१.९९ लाख डोसपैकी १६२.५ लाख डोस कोव्हिशिल्डचे आहेत, तर २९.४९ लाख डोस कोव्हॅक्सिनचे आहेत.

    राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना किती लशी उपलब्ध होणार आहेत त्याची आगाऊ सूचना देण्यामागे त्यांनी परिणामकारक योजना आखण्याचा उद्देश आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

    Government Of Indian will provide 192 lakh Vaccine Dose’s free to Sates

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न