• Download App
    केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार Government of India targets to procure 20-25 crore vaccine doses by July end, and 30 crore doses in August-September.

    केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होताच केंद्र सरकार अधिक सतर्क झाले असून सरकार जुलैअखेर विविध कंपन्यांकडून कोविड प्रतिबंधक लसींचे २० ते २५ कोटी डोस मिळवणार असल्याचे सरकारी सूत्रांनी आज स्पष्ट केले आहे. Government of India targets to procure 20-25 crore vaccine doses by July end, and 30 crore doses in August-September.

    जूनअखेरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट सरकारला कोविशिल्ड लसीचे १० ते १२ कोटी डोस उपलब्ध करून देईल, असे सिरमच्या पत्रकात सांगण्यात आले आहे. याखेरीज भारत बायोटेक आणि अन्य कंपन्यांकडून देखील केंद्र सरकार लसी पुरवठा करवून घेणार आहे. ऑगस्ट – सप्टेंबर २०२१ पर्यंत ३० कोटी डोस मिळतील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

    वर्षभरापूर्वी अवघ्या २ कंपन्या कोविड प्रतिबंधक लसी बनवत होत्या. आता १३ कंपन्यांना लसी बनविण्याची परवानगी देण्यात आली आहे. लवकरच आणखी १९ कंपन्या लस उत्पादनात उतरतील. भारत बायोटेक कंपनी सध्या महिन्याला १.३० कोटी व्हॅक्सिन डोस बनवतीय.

    ऑक्टोबर २०२१ पर्यंत हीच कंपनी महिन्याला १० कोटी डोसचे उत्पादन करेल. मोदी सरकारच्या वेगवान निर्णयप्रक्रियेमुळे हे शक्य झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

    Government of India targets to procure 20-25 crore vaccine doses by July end, and 30 crore doses in August-September.

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’