• Download App
    Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने सुरू केले 'ऑपरेशन अजय' Government launched Operation Ajay to repatriate Indians from Israel

    Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने सुरू केले ‘ऑपरेशन अजय’

    भारतीयांना आणण्यासाठी पहिले विमान आज रवाना होणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यात ७ ऑक्टोबरपासून युद्ध  सुरू आहे. दरम्यान, अनेक देशांनी आपल्या नागरिकांना तेथून बाहेर काढले आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन अजय’ सुरू करण्याची घोषणाही केली आहे. याअंतर्गत आज (गुरुवार) पहिले विमान उड्डाण करणार आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काल ही माहिती दिली. Government launched Operation Ajay to repatriate Indians from Israel

    “इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या आमच्या नागरिकांच्या सुविधेसाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले जात आहे. विशेष चार्टर फ्लाइट आणि इतर व्यवस्था केल्या जात आहेत.  परदेशात आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत.”  परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.

    इस्रायलवर हमासच्या हल्ल्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहून सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. दूतावासाने आपल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले होते- ‘सध्याची परिस्थिती पाहता इस्रायलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची विनंती करण्यात येत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा नियमांचे पालन करा. कृपया सावधगिरी बाळगा, अनावश्यक हालचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणांजवळ रहा.

    Government launched Operation Ajay to repatriate Indians from Israel

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले