प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण ( Maha RERA Recruitment) येथे वित्त सल्लागार, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार पदांच्या २१ जागा रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२२ आहे. Government job opportunities; Salary up to 65 thousand, apply immediately
- अटी आणि नियम
पदाचे नाव : वित्त सल्लागार, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार
पदसंख्या : २१ जागा
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन
ई-मेल पत्ता :
techoff2@maharera.mahaonline.gov.in
अर्जाची शेवटची तारीख : १० नोव्हेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट : https://maharera.mahaonline.gov.in/
- शैक्षणिक पात्रता
वित्त सल्लागार : एमबीए फायनान्स/ सीए, किमान ३ वर्षांचा अनुभव आर्थिक ज्ञान, CA इंटर्न आर्टिकलशिप प्रशिक्षण घेत आहे
वरिष्ठ सल्लागार : एलएलबी, कायदेशीर सल्लागार म्हणून किमान १० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचा अनुभव, संगणक प्रवीणता
कनिष्ठ सल्लागार : एलएलबी, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार म्हणून किमान ० ते ३ वर्षांचा अनुभव, संगणक प्रवीणता
- वेतनश्रेणी
वित्त सल्लागार : ५० हजार रुपये
वरिष्ठ सल्लागार : ६५ हजार रुपये
कनिष्ठ सल्लागार : ३५ हजार रुपये
Government job opportunities; Salary up to 65 thousand, apply immediately
महत्वाच्या बातम्या
- ऋषी सुनक ब्रिटनमध्ये पंतप्रधान बनू शकतात, तर भारतातही मुस्लिम पंतप्रधान बनेल; फारूख अब्दुल्लांचा तर्क
- एलन मस्कचा ट्विटरवर ताबा; टॉप बॉसेसना बाहेरचा रस्ता
- केंद्रीय तपास यंत्रणांना असहकार्य; पंतप्रधान मोदींनी राज्यांना करून दिली कर्तव्याची जाणीव
- महाराष्ट्रात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू; “असा” करा अर्ज