विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मोदी 3.0 सरकारने शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता बँकखात्यांमध्ये जमा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) मोठी वाढ केली. मोदी सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. government approves msp for 14 kharif crops
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळाने खरीप हंगामातील 14 पिकांसाठी वाढीव किमान आधारभूत किंमत मंजूर केली आहे. त्यानुसार, कापसाला 7121 रुपये, भाताला 2300 रुपये किमान आधारभूत किंमत मंजूर करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केल्याने सरकारच्या तिजोरीवर सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा भर पडले, अशी माहिती त्यांनी दिली.
2018 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या किंमतीच्या किमान दीडपट किमान आधारभूत किंमत दिली जाईल, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसारच मंत्रिमंडळाने किमान आधारभूत किंमतचे दर निश्चित केले आहेत, असेही ते म्हणाले.
एमएमसपीचे नवे दर (प्रति क्विंटलमध्ये म)
1. नाचणी : 2490 रुपये
2. बाजरी : 2625 रुपये
3. सोयाबीन : 4892 रुपये
4. मुग : 8692 रुपये
5. तूर : 7550 रुपये
6. तीळ : 9267 रुपये
7. भात : 2300 रुपये
8. ज्वारी : 3371 रुपये
9. उडीद : 7400 रुपये
10. कापूस : 7121 रुपये
11. भुईमुग : 6783 रुपये
12. रेप सीड : 8717 रुपये
13. मका : 2225 रुपये
14. सूर्यफुल : 7280 रुपये
government approves msp for 14 kharif crops
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार